हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:07 PM2020-07-17T15:07:49+5:302020-07-17T15:12:42+5:30

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 39 लाख 50,035 इतकी झाली आहे. त्यापैकी 82 लाख 79,182 रुग्ण बरे झाले आहेत आणि 5 लाख 92,696 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. त्यापैकी 6 लाख 36,602 रुग्ण बरे झाले आहेत आणि 25,609 जणांचा मृत्यू झाला आहे.

पण, याही परिस्थितील भारताची स्टार बॅडमिंनटपटू ज्वाला गुट्टानं बॉयफ्रेंड विष्णू विशाल याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हैदराबाद ते चेन्नई असा प्रवास केला.

विष्णू विशाल शुक्रवारी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून ज्वाला आणि विष्णू यांच प्रेमप्रकरण आहे आणि तिनं त्याच्या वाढदिवसाला सरप्राईज दिलं. ती थेट त्याच्या घरी पोहोचली.

मागील आठवड्यात ती चेन्नईला पोहोचली होती. बॉयफ्रेंडच्या वाढदिवसासाठी तिनं हा सर्व प्लान आखला होता.

विष्णू विशालनं तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

ज्वालानंही तिच्या अकाऊंटवर फोटो पोस्ट करताना बॉयफ्रेंडला शुभेच्छा दिल्या.