पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'संकल्प पत्र' प्रसिद्ध! पाहा भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:51 AM2024-04-14T10:51:06+5:302024-04-14T10:51:53+5:30

BJP Manifesto Sankalp Patra: जगभर रामायण उत्सव करण्याचे वचन आणि बरंच काही... वाचा भाजपाचे 'संकल्प पत्र'

lok sabha election 2024 bjp manifesto sankalp patra launched by pm narendra modi for viksit bharat development roadmap quality of life | पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'संकल्प पत्र' प्रसिद्ध! पाहा भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'संकल्प पत्र' प्रसिद्ध! पाहा भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने

BJP manifesto Sankalp Patra, PM Modi: लोकसभा निवडणुकांचा 'फिव्हर' आता हळूहळू अधिक तीव्र होत चालला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यासोबतच आपण सत्तेत आलो तर काय देणार याबद्दलही भाष्य करत आहेत. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रसिद्ध केला.

----

जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्याचे काम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली एका समितीकडे होते. अनेक वेळा बैठका झाल्यानंतर हा जाहीरनामा म्हणजे 'संकल्प पत्र' तयार करण्यात आले आहे. भाजपाच्या संकल्प पत्रात विकसित भारत मुद्द्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. संकल्प पत्र जाहीर केल्यानंतर, शुभारंभानंतर देशातील प्रत्येक विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींना संकल्प पत्राची प्रत देण्यात आली.

संकल्प पत्र जारी केल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले, “आजचा दिवस खूप शुभ आहे. यावेळी देशातील अनेक राज्यांमध्ये नवीन वर्ष साजरे केले जात आहे. आज, नवरात्रीच्या सहाव्या दिवशी, आपण सर्वजण माँ कात्यायनीची पूजा करतो आणि माँ कात्यायनीच्या दोन्ही हातांमध्ये कमळ असते. हा योगायोग मोठे वरदानच आहे. त्यासह आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदेखील आहे. अशा शुभ मुहूर्तावर भाजपने विकसित भारताचा जाहीरनामा देशासमोर ठेवला आहे. मी तुम्हा सर्वांचे, सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.”

"संपूर्ण देश भाजपच्या संकल्प पत्राची आतुरतेने वाट पाहत होता. यामागे एक मोठे कारण आहे. गेल्या १० वर्षात भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक मुद्द्याची हमी देऊन अंमलबजावणी केली आहे. भाजपने जाहीरनाम्यातील अचूकता वेळोवेळी दाखवून दिली आहे. हे ठराव पत्र विकसित भारताच्या सर्व ४ स्तंभांना - युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकरी यांना अधिक मजबूत व सक्षम करते. गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर आमचे लक्ष आहे. मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, अशी मोदींची हमी आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही खात्री करू. आता भाजपाने संकल्प केला आहे की, ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. तसेच ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळतील," अशा विविध मुद्द्यांवर मोदींनी प्रकाश टाकला.

भाजपच्या 'संकल्प पत्रा'त कोणती आश्वासने?

  1. वन नेशन वन इलेक्शन लागू करणार.
  2. नारी वंदन कायदा लागू करणार.
  3. शैक्षणिक धोरण राष्ट्रीय स्तरावर राबवणार.
  4. रेल्वेतील प्रतिक्षा यादी दूर करण्याचा प्रयत्न करणार.
  5. जगभर रामायण उत्सव करण्याचे वचन.
  6. २०३६पर्यंत भारतात ऑलिम्पिक आयोजित करण्याचे वचन.
  7. योगासनांचे अधिकृत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन.
  8. पेट्रोलची आयात कमी करण्याचे आश्वासन.
  9. अयोध्येचा व्यापक स्तरावर विकास केला जाईल.
  10. शहरे अधिक 'लिबरल' बनवणार.
  11. कचऱ्यापासून मुक्ती आणि स्वच्छ भारतासाठी मिशन मोडमध्ये काम करणार.
  12. सर्वांना शुद्ध पाणी देण्याचे वचन.
  13. अमृत ​​भारत, वंदे भारत अशा आणखी ट्रेन्स येतील.
  14. शून्य वीज बिलासाठी काम करणार.

Web Title: lok sabha election 2024 bjp manifesto sankalp patra launched by pm narendra modi for viksit bharat development roadmap quality of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.