काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये; 'INDIA' आघाडीतील घटक पक्षाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:02 PM2024-04-01T16:02:34+5:302024-04-01T16:06:42+5:30

Loksabha Election 2024: रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीनं अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ महारॅलीचं आयोजन केले. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी इंडिया आघाडीतील घटक पक्ष सीपीआय(M) ने केजरीवालांच्या अटकेसाठी काँग्रेसला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

Kerala CM Pinarayi Vijayan criticizes Congress and Rahul Gandhi for arrest of Arvind Kejriwal | काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये; 'INDIA' आघाडीतील घटक पक्षाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये; 'INDIA' आघाडीतील घटक पक्षाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

कोझिकोड - Pinarayi Vijayan on Rahul Gandhi ( Marathi News ) दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनिषेधार्थ इंडिया आघाडीनं रामलीला मैदानात लोकशाही बचाओ महारॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी इंडिया आघाडीतील घटक पक्षाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसकडूनअरविंद केजरीवालांवर आरोप करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसनेच दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला. विशेष म्हणजे दिल्लीच्या महारॅलीत राहुल गांधी यांच्यासोबत सीपीआय(M) चे महासचिव सीताराम येचुरीही सहभागी होते. 

मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं की, वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी पुन्हा निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सीपीआयचा उमेदवार मैदानात आहे. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. पण वायनाडमध्ये ते कोणाविरोधात लढाई लढतायेत हे पाहा. त्याठिकाणी सीपीआयचे एनी राजाविरोधात राहुल गांधी उभे आहेत. काँग्रेस आणि सीपीआय इंडिया आघाडीचा भाग आहे. मात्र ते भाजपाशी लढण्याऐवजी सीपीआयच्या उमेदवाराला आव्हान देत आहेत असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, वायनाडमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवून भाजपाने खेळी खेळली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बीडीजेएसने एकत्रित निवडणूक लढली होती. त्यावेळी तुषार वेल्लापल्ली त्यांचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना जवळपास ७८ हजार मते मिळाली होती जी ७.२५ टक्के होती. तर राहुल गांधींना ४ लाख ३१ हजाराहून अधिक मतदान झाले होते. मोठ्या मताधिक्यांनी त्यांनी ही जागा जिंकली. 

राहुल गांधींनी साधला होता भाजपावर निशाणा

रविवारी दिल्लीत झालेल्या महारॅलीत राहुल गांधींनी भाजपावर आरोप केला होता. पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं सारा देश आणि भाजपाचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगातील दोन पंचही त्यांनीच निवडले. सामना सुरु होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकले. ही मॅच फिक्सिंग मोदी आणि भारतातील तीनचार सर्वात मोठे उद्योगपती करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. 

Web Title: Kerala CM Pinarayi Vijayan criticizes Congress and Rahul Gandhi for arrest of Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.