बायपास मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:39 AM2021-08-17T10:39:48+5:302021-08-17T10:50:29+5:30

जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, 4 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जळून सर्वकाही खास झाले होते.

Four people were killed when two trucks collided head-on on the bypass road in ajmer rajasthan | बायपास मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू

बायपास मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देब्यावर व अजमेर येथून मार्बल आणि पावडर भरुन दोन ट्रक येते होते. त्यात, ब्यावरकडून येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेचा डुकली आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, हा ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला.

अजमेर - राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. दोन मालवाहतूक ट्रकची समोरसमोर धडक बसल्यानंतर दोन्ही गाडीने पेट घेऊन मोठी आग लागली होती. या दुर्घटनेत गाडीच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण 4 जण ठार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आदर्श नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. 

जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, 4 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जळून सर्वकाही खास झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीताराम प्रजापती यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ब्यावर व अजमेर येथून मार्बल आणि पावडर भरुन दोन ट्रक येते होते. त्यात, ब्यावरकडून येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेचा डुकली आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, हा ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. दरम्यान, समोरुन येणाऱ्या ट्रकलाही त्याने जोरीची धडक दिल्याने दोन गाड्यांच्या टाकीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन्ही ट्रकच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. 


दरम्यान, अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी पोलीस प्रशासनला सूचना दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतांचे शव गाडीतून बाहेर काढण्यात आले असून जेएलएन रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहे. 

Web Title: Four people were killed when two trucks collided head-on on the bypass road in ajmer rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.