मोदी यांच्या सभेमुळे पेन्शनधारकांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:54 AM2019-04-19T00:54:14+5:302019-04-19T00:55:38+5:30

केंद्र सरकारातील एका मंत्र्याने पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्याची पूर्तता करावी यासाठी थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पिंपळगावच्या सभेसमोर आंदोलनाची परवानगी मागणाऱ्या जिल्हा ई.पी.एस. पेन्शनर्स फेडरेशनच्या वृद्ध सदस्यांची प्रशासनाने ससेहोलपट चालविली आहे.

 Modi's meeting led to pensioners' ruckus | मोदी यांच्या सभेमुळे पेन्शनधारकांची ससेहोलपट

मोदी यांच्या सभेमुळे पेन्शनधारकांची ससेहोलपट

googlenewsNext

नाशिक : केंद्र सरकारातील एका मंत्र्याने पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्याची पूर्तता करावी यासाठी थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पिंपळगावच्या सभेसमोर आंदोलनाची परवानगी मागणाऱ्या जिल्हा ई.पी.एस. पेन्शनर्स फेडरेशनच्या वृद्ध सदस्यांची प्रशासनाने ससेहोलपट चालविली आहे. मोदी यांची सभा चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पेन्शनर्सच्या नेमक्या काय मागण्या आहेत, याबाबत प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले, परंतु त्यांची भेट घेण्याचे टाळल्याने संतापलेल्या पेन्शनर्सला नंतर मात्र पिंपळगाव पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने मात्र पेन्शनर्सला बोलावले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
ई.पी.एस. पेन्शनधारकांची पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी असून, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे राष्टÑीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर ९० दिवसांत पेन्शनधारकांना कमीत कमी तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येईल, त्याचबरोबर महागाई भत्ताही देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; परंतु आता पाच वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पेन्शनधारकांनी वेळोवेळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे पिंपळगावी निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याचा निर्णय पेन्शनधारकांनी घेतला असून, तसे पत्रही त्यांनी प्रशासन तसेच पोलिसांना दिले आहे. पेन्शनधारकांच्या या आंदोलनाने सरकारविषयी नकारात्मक भावना निर्माण होईल म्हणून पेन्शनधारकांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी सकाळी अकरा वाजता भविष्य निर्वाह निधी आयुक्त व काही पेन्शनर्सला चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. तथापि दोन तास बसूनही त्यांची भेट घेण्यात आली नाही, त्यामुळे संतापलेल्या पेन्शनर्सनी घरचा रस्ता धरला; परंतु घरी गेल्यावर त्यांच्या नावे पिंपळगावी पोलिसांची नोटीस मिळाली. या नोटिसीत मोदी यांच्या सभेत काही अनुचित प्रकार घडल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शनर्स आणखीनच चिडले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्यावर ते ठाम आहेत.

Web Title:  Modi's meeting led to pensioners' ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.