मनसेच्या इंजिनाचे काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:41 AM2019-04-11T00:41:52+5:302019-04-11T00:42:28+5:30

पदार्पणातच विधानसभेच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या मनसेला त्यानंतरच्या काळात मात्र फारसे यश मिळाले नाही़

Congress and NCP who will gain from MNS ? | मनसेच्या इंजिनाचे काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ ?

मनसेच्या इंजिनाचे काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ ?

Next

शिवराज बिचेवार।

नांदेड : पदार्पणातच विधानसभेच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या मनसेला त्यानंतरच्या काळात मात्र फारसे यश मिळाले नाही़ मनसेचे अनेक शिलेदार इतर पक्षात गेले अन् स्थिरावलेही़ त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे नसली तरी, भाजपा-सेनेच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे सभा घेत आहेत़ त्यामुळे या निवडणुकीत मनसेच्या इंजिनाचे बळ काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे़
तरुणाईमध्ये राज ठाकरे यांची क्रेझ आजही कायम आहे, हे त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीवरुन लक्षात येते़ नांदेडात मनसेची म्हणावी तेवढी ताकद नसली तरी, मनसेच्या मतांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही़
नांदेड उत्तर, दक्षिण यासह शहरी भागात नवमतदारांवरही मनसेची नजर आहे़ त्यात नांदेड मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नसल्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि मनसेत गेलेले भाजपावर कितपत विश्वास ठेवतील हाही प्रश्न आहे़ गेल्या काही दिवसांत मनसेने नांदेडात विविध प्रश्नावर आंदोलन केली आहेत़ या आंदोलनाला तरुणाईने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता़ त्यात राज ठाकरे यांनी भाजपा-सेनेच्या विरोधात आघाडी उघडून सडकून टीका करण्यास सुरुवात केल्यामुळे मनसेची मते काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे़ राज ठाकरे आपल्या भाषणात मुद्देसुद मांडणी करीत असताना त्या विषयाच्या क्लीपही दाखवत आहेत. राज ठाकरे यांचा नांदेडातही मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. ठाकरे जे मुद्दे मांडत आहेत ते मतदारांना निश्चितपणे पटत आहेत. नांदेडमध्ये राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार? आणि कोणावर टीका करणार? याकडेही लक्ष लागले आहे.
चार विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त
राज्याच्या राजकारणात मनसेचा उदय झाल्यानंतर नांदेड महापालिकेत २००७ मध्ये मनसेने आपले उमेदवार उभे केले होते़ त्यावेळी सिडको प्रभागातून नम्रता लाठकर या नगरसेवक म्हणून विजयी झाल्या होत्या़विधानसभा निवडणुकीत दिलीप ठाकूर, प्रकाश मारावार, रोहिदास चव्हाण आणि धनलाल पवार यांनी नशीब आजमावले होते़ परंतु, या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते़

Web Title: Congress and NCP who will gain from MNS ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.