श्रृती मराठेचा बालपणीचा हा निरागस अंदाज तुम्ही पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 14:19 IST2017-07-24T08:48:27+5:302017-07-24T14:19:53+5:30

छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी राधा अर्थात राधा ही बावरी फेम अभिनेत्री श्रृती मराठे. आपल्या अभिनयाने श्रृती घराघरात पोहचली आहे. ...

Have you seen this beautiful story of Shruti Marathe's childhood? | श्रृती मराठेचा बालपणीचा हा निरागस अंदाज तुम्ही पाहिलाय का?

श्रृती मराठेचा बालपणीचा हा निरागस अंदाज तुम्ही पाहिलाय का?

ट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी राधा अर्थात राधा ही बावरी फेम अभिनेत्री श्रृती मराठे. आपल्या अभिनयाने श्रृती घराघरात पोहचली आहे. मालिकांसोबतच विविध मराठी सिनेमांमध्ये श्रृतीने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दाक्षिणात्य सिनेमातही श्रृतीच्या अभिनयाचा जलवा पाहायला मिळाला. श्रृतीची विविध रुपं रसिकांनी पाहिली आहेत. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. वेगवेगळ्या अंदाजातील श्रृतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. आता श्रृतीचा एक फोटो समोर आला आहे. तिचा हा फोटो बालपणीचा आहे. बालपणीचे फोटो आणि आठवणी कुणासाठीही खास असतात. तसाच श्रृतीने शेअर केलेला हा फोटो तिच्यासाठी थोडा खास आहे. या फोटोमध्ये श्रृती आणि तिचा भाऊ पाहायला मिळत आहे. बालपणीचा श्रृतीचा अंदाज कुणालाही मोहून टाकेल असाच आहे. भावाबहिणींचं नातं हे अनोखं असतं. रुसवेफुगवे, भांडणं आणि खूप सारं प्रेम म्हणजे भावाबहिणीचं नातं. असंच प्रेम श्रृती आणि तिच्या भावामध्येही आहे. हेच प्रेम या फोटोतही पाहायला मिळत आहे. याशिवाय श्रृतीचा खास अंदाजही तितकाच लक्षवेधी आहे. बालपणी श्रृतीची बॉयकट हेअरस्टाईल होती. बॉयकट अंदाजातील श्रृतीचा अंदाज क्यूट असाच असल्याचं पाहायला मिळतंय. श्रृतीचा पूर्ण लूक स्पोर्टी असल्याचंही यांत दिसत आहे. एकूणच आपल्या अंदांनी विविध सिनेमात रसिकांची मनं जिंकणा-या श्रृतीचा बालपणीचा हा निरागस अंदाज नक्कीच आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.काही महिन्यांपूर्वीच श्रृती मराठेने अभिनेता गौरव घाटणेकरशी लग्न करत आपला संसार थाटला आहे.

Web Title: Have you seen this beautiful story of Shruti Marathe's childhood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.