मविआकडून उमेदवार निश्चित? वसंत मोरेंच्या पदरी निराशा? पुणे लोकसभेची चुरस वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 04:49 PM2024-03-21T16:49:42+5:302024-03-21T16:49:58+5:30

Vasant More On Lok Sabha Election 2024 Candidancy: महाविकास आघाडीचा पुण्यातील उमेदवार तसेच मनसेचा महायुतीतील सहभाग यावर वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

vasant more reaction on pune lok sabha 2024 candidancy and mns likely to support mahayuti | मविआकडून उमेदवार निश्चित? वसंत मोरेंच्या पदरी निराशा? पुणे लोकसभेची चुरस वाढणार!

मविआकडून उमेदवार निश्चित? वसंत मोरेंच्या पदरी निराशा? पुणे लोकसभेची चुरस वाढणार!

Vasant More On Lok Sabha Election 2024 Candidancy: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि उमेदवारीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे. भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावरून आता वसंत मोरे यांचा महाविकास आघाडीकडून लोकसभा लढवण्याचा मार्ग बंद होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वसंत मोरे यांनी यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

मीडियाशी बोलताना वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आली. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याच्या प्रश्नावर बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी निवडणूक लढवण्यासाठी बाहेर पडलो आहे. माझी लढाई स्वाभिमानाची आहे. रवींद्र धंगेकर माझे मित्र होते. गटनेते होते. आताही आमची मैत्री चांगली आहे. रवींद्र धंगेकर यांना आमदारीनंतर आता खासदारकी मिळत असेल, तर ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे आणि ते त्याचा १०० टक्के फायदा करून घेतील. पण असे असले तरी मीही त्या निवडणूक रिंगणात आहे, असे वसंत मोरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

...तर मला वरिष्ठ पातळीवरून फोन आले नसते

भाजपा सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. एवढे होऊनही लोकसभा निवडणुक एकतर्फी होणार अशी वल्गना केली जात असेल तर, जोपर्यंत वसंत मोरे पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत ही निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही. पुण्यातील निवडणुक एकतर्फी होणार असती तर मला वरिष्ठ पातळीवरून फोन आले नसते, असे वसंत मोरे म्हणाले. 

लोकसभा निवडणूक लढण्यावर १०० टक्के ठाम

मध्यंतरीच्या काळात मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. पुणे शहरात लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन कशाप्रकारे मोट बांधता येईल यावर चर्चा केली होती. अजून निवडणुकीची रंगत येण्यास वेळ आहे. पण ही निवडणुक मी एकतर्फी होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार वसंत मोरे यांनी केला. तसेच प्रसंगी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास तयार असल्याचे वसंत मोरे यांनी सूचित केले आहे. 
 

Web Title: vasant more reaction on pune lok sabha 2024 candidancy and mns likely to support mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.