नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 04:44 PM2024-04-19T16:44:15+5:302024-04-19T16:45:09+5:30

Shiv Sena Shinde Group Hemant Godse News: नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी हेमंत गोडसे आग्रही आहेत.

shiv sena shinde group hemant godse reaction after chhagan bhujbal withdraw claim on nashik lok sabha election 2024 | नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Shiv Sena Shinde Group Hemant Godse News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप, उमेदवारी यावरून राजकीय वर्तुळात मानापमान नाट्य घडताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष, नेते यांच्यात नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे घोषित केले आहे. यानंतर नाशिक मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला गेले होते. आम्ही आपल्या पक्षाचे नाशिकमध्ये जास्त आमदार असल्याने नाशिक लोकसभेची जागा मागितली. या जागेवर आम्ही आपल्याकडून समीर भुजबळ यांचे नाव सुचवले होते. मात्र अमित शाह यांनी सांगितले की तिथे आपले उमेदवार छगन भुजबळ हे असावेत. तुम्हालाच तिथून लढावे लागेल. अजित पवारांनी सांगितल्यानुसार मी नाशिकमध्ये तयारी सुरू केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिथे दावा सांगितला. या गोष्टीला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. अजूनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे, समोरच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले आणि ते जोरदारपणे कामाला लागले आहेत. परिणामी महायुतीला नाशिकच्या जागेवर अडचण निर्माण होऊ शकते. हा डेडलॉक तोडण्यासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली. 

छगन भुजबळ यांचे आभार व्यक्त करतो

निश्चितच वेळ कमी पडत चालला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी माघार घेतली. या निर्णयाबाबत छगन भुजबळ यांचे आभार मानतो. या जागेवर लवकरच महायुतीकडून निर्णय जाहीर होऊ शकेल. मुख्यमंत्री आणि आमचे मुख्यनेते एकनाथ शिंदे लवकरच उमेदवारीबाबत निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळावी, यासाठी हेमंत गोडसे आग्रही आहेत. यासाठी हेमंत गोडसे यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीही घेतल्या होत्या.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक या ठिकाणचा तिढा आता जवळपास सुटला आहे. या ठिकाणचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. एनडीएचे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हेच नाव आधीपासूनच निश्चित आहे. मात्र, विरोधकांकडे अद्याप चेहरा निश्चित झालेला नाही. आम्ही नरेंद्र मोदी आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. इंडिया आघाडीत सगळ्यांना पंतप्रधान व्हायचे आहे, अशी टीका शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केली.
 

Web Title: shiv sena shinde group hemant godse reaction after chhagan bhujbal withdraw claim on nashik lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.