मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार; CM एकनाथ शिंदेंची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:34 PM2024-04-22T13:34:01+5:302024-04-22T13:34:44+5:30

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अद्यापही महायुतीत काही जागांवर तिढा आहे. त्यात कोणत्या पक्षाला किती जागा यावर स्पष्टता नाही. मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना १६ जागांवर लढणार हे स्पष्ट केले.

Lok sabha Election 2024 - Shiv Sena will contest 16 seats in Mahayuti including 3 seats in Mumbai; Information about CM Eknath Shinde | मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार; CM एकनाथ शिंदेंची माहिती 

मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार; CM एकनाथ शिंदेंची माहिती 

मुंबई - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त महायुतीत अद्यापही काही जागांचा तिढा कायम आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकूण १६ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. या १६ जागांमध्ये मुंबईतल्या ३ जागांचा समावेश आहे. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदारसंघाचा समावेश आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी १६ जागा लढवणार असल्याचं बोललं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जागावाटपावरून महायुतीत कुठलाही तणाव नाही. २०१९ च्या निवडणुकीत युतीनं ४२ जागा जिंकल्या होत्या यंदा हा रेकॉर्ड आम्हाला मोडायचा आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यात आम्ही सर्व जागा जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचसोबत भाजपाच्या सर्व्हेमुळे हेमंत पाटील, भावना गवळी यांना तिकिट नाकारलं का यावर मुख्यमंत्र्यांनी नकार देत पक्षांतर्गत चर्चेनंतर उमेदवार बदलण्याचा निर्णय झाला, त्यात भाजपाने उमेदवार बदलायला सांगितले हा प्रश्नच उद्भवत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तसेच आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याची घाई उद्धव ठाकरेंना झाली होती. मात्र आदित्य मुख्यमंत्री बनण्यात माझा अडथळा होता असं त्यांना वाटायचे. त्यामुळे माझ्या नगरविकास खात्यात कायम आदित्य ठाकरे हस्तक्षेप करायचे. मला कुठलीही माहिती न देता ते नगरविकास खात्याची, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसीची बैठक लावायचे. महाविकास आघाडी सरकार असताना माझ्याकडून नगरविकास खाते काढून घ्यायचं प्लॅनिंग उद्धव ठाकरे करत होते. इतकेच नाही तर नक्षलांकडून मला धमकी आलेली असतानाही त्यांनी माझी सुरक्षा वाढवण्यास नकार दिला असा आरोपही एकनाथ शिंदेंनी केला. 

दरम्यान, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणल्याचं एकनाथ शिंदेंनी नाकारलं. याउलट उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनणार असं सांगितले होते. जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होत होते, तेव्हा मला मुख्यमंत्री बनवलं जाईल या अपेक्षेने माझा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. परंतु त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे नाव सुचवल्याचं मला सांगण्यात आले. पण पवारांनी मला स्पष्ट सांगितले, सेनेकडून काही माणसं उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस घेऊन मला भेटले. त्यांनीच मला उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितले असा दावाही एकनाथ शिंदेंनी केला. 

 

Web Title: Lok sabha Election 2024 - Shiv Sena will contest 16 seats in Mahayuti including 3 seats in Mumbai; Information about CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.