कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:57 PM2024-04-13T12:57:29+5:302024-04-13T12:59:51+5:30

पाटील याच्यानंतर कांबळे आडनाव असलेल्या मतदारांची संख्या जास्त

the number of voters with surname Patil is more than voters with other surnames In Kolhapur district | कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या

कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या

असिफ कुरणे

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असणाऱ्या मतदारांची संख्या ही इतर आडनावांच्या मतदारांपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ३ लाख ३९ हजार तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २ लाख ६३ हजार ५६३ पाटील आडनावाचे मतदार आहेत. त्यानंतर कांबळे आडनावाचे मतदार असून, त्यांची संख्या कोल्हापूर मतदारसंघात १ लाख, तर हातकणंगले मतदारसंघात ८२ हजार ४२१ एवढी आहे. त्यानंतर जाधव आडनावाचे मतदार जास्त आहेत. मतांची ही आकडेवारी पाहता दोन्ही मतदारसंघात पाटलांचीच ताकद जास्त दिसते.

निवडणुकीच्या मतदार याद्यांचे विश्लेषण केल्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असलेल्या मतदारांचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. शिरोळ, हातकणंगले, इस्लामपूर वाळवा या मतदारसंघात पाटील आडनावात मराठा व जैन समाजाच्या मतदारांचा समावेश दिसतो. इतर मतदारसंघात मात्र मराठा पाटील यांची संख्या जास्त आहे.

कोल्हापूर लोकसभेत राधानगरी भुदरगड व करवीर विधानसभा मतदारसंघात पाटील आडनावाचे मतदार जास्त आहेत. राधानगरी, भुदरगडमध्ये तब्बल ९० ४५२ एवढे म्हणजे २४ टक्के तर करवीरमध्ये ८३ हजार ५८३ (२७.५ टक्के) पाटील मतदार आहेत. या मतदारसंघात निकाल प्रभावित करण्याची ताकद पाटील नावाच्या मतदारांमध्ये आहे. तर, हातकणंगले लोकसभेत शिराळा मतदारसंघात ७०,४४० (२४ टक्के) तर शाहूवाडी मतदारसंघात ६७,९६० (२३ टक्के) पाटील मतदार आहेत.

पाटील याच्यानंतर कांबळे आडनाव असलेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. राधानगरी मतदारसंघात २७,८८९ तर करवीरमध्ये २५ हजार कांबळे आडनावाचे मतदार आहेत. त्यानंतर जाधव आडनावाचे मतदार आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात जाधव, नाईक, सुतार, कुंभार या आडनावांची संख्यादेखील हजारात आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

आडनाव -  एकूण मतदार


चंदगड विधानसभा
पाटील -   ५३,६४२
कांबळे -  २०,९७५
नाईक -  ११,३४७

राधानगरी भुदरगड विधानसभा
पाटील  -  ९०,४५२
कांबळे - २७,८८९
सुतार -  ९७९८

कागल विधानसभा
पाटील  -  ५५,८४४
कांबळे -  २१,७५७
जाधव -  ८३४०

कोल्हापूर दक्षिण
पाटील  -  ३६,६८०
कांबळे -  १२,७७२
जाधव  -  ८,१८७

कोल्हापूर उत्तर
पाटील  - १८,८१३
जाधव  -  ८,६८३
कांबळे -   ७,८१४

करवीर विधानसभा
पाटील -  ८३,५८३
कांबळे - २४,९२३
जाधव  -  ७,९०२

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

शाहूवाडी विधानसभा
पाटील -  ६७,९६०
कांबळे  -  १४,३५३
जाधव   -   ९०८०

हातकणंगले विधानसभा
पाटील -   ४०,४३८
कांबळे -  २००५७
जाधव -  ८७३४

इचलकरंजी विधानसभा
पाटील  -   १५,४१७
कांबळे - १०,९७०
जाधव   -  ५,३३६

शिरोळ विधानसभा
पाटील  -  २९९३४
कांबळे  -  २०,४८१
जाधव -  ४०९६

इस्लामपूर वाळवा विधानसभा
पाटील  -  ३९,३७४
कांबळे  -  ८,२०३
जाधव  -  ९,८४३

शिराळा विधानसभा
पाटील   -  ७०४४०
कांबळे -  ८३५७
जाधव  -  १२,२३७

Web Title: the number of voters with surname Patil is more than voters with other surnames In Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.