रणबीर- ऐश्वर्याचा ' हा' फोटो पाहिलात का?

By Admin | Published: September 28, 2016 10:38 AM2016-09-28T10:38:39+5:302016-09-28T11:14:34+5:30

अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस असून त्याचा व ऐश्वर्या रायचा १८ वर्षांपूर्वीचा एक फोटो सध्या खूप व्हायरल झाला आहे.

Ranbir - Have you seen Aishwarya's photo? | रणबीर- ऐश्वर्याचा ' हा' फोटो पाहिलात का?

रणबीर- ऐश्वर्याचा ' हा' फोटो पाहिलात का?

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ -  दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ' ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चनच्या केमिस्ट्रीची सध्या खूप चर्चा होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर- ऐश्वर्या पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचे पोस्टर असो, टीझर असो वा ट्रेलर त्या दोघांची हॉट केमिस्ट्री दिसत असून चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. 
मात्र नुकताच इंटरनेट रणबीर-ऐश्वर्याचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे.
रणबीरचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने लेखक- दिग्दर्शक रूमी जाफरीने रणबीर-ऐश्वर्याचा एक जुना फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो १८ वर्षांपूर्वीचा असून त्यामध्ये ते दोघे हसून पोझ करत आहेत. ' आ अब लौट चले' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अमेरिकेत हा फोटो काढण्यात आला होता. मात्र १८ वर्षांनतर हेच दोघे चित्रपटात एकत्र काम करतील असं कोणाला वाटलही नसेल..!
 
 

 

Web Title: Ranbir - Have you seen Aishwarya's photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.