हुमाला ‘या’ रोलने दिली हुलकावणी!

By Admin | Published: June 17, 2017 01:20 AM2017-06-17T01:20:43+5:302017-06-17T01:20:43+5:30

ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर रजनीकांत ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स

Humma 'rolled' rolling! | हुमाला ‘या’ रोलने दिली हुलकावणी!

हुमाला ‘या’ रोलने दिली हुलकावणी!

googlenewsNext

ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर रजनीकांत ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार असल्याची बातमी आम्हीच तुम्हाला दिली होती. पण बातमीत थोडे ट्विस्ट आलेय. होय, रजनीकांतच्या ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा आहे. पण ती या चित्रपटाची हिरोईन नाहीच. तामिळ इंडस्ट्रीत डेब्यू करणाऱ्या हुमाला रजनीकांतच्या लीड अ‍ॅक्ट्रेसच्या रोलने हुलकावणी दिलीय. कारण या चित्रपटात रजनीकांतच्या ‘लव्ह इंटरेस्ट’चा रोल अभिनेत्री ईश्वरी राव करताना दिसणार आहे. हुमाचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण ती रजनीकांतसोबत रोमान्स करताना दिसणार नाही. ती यात जरीना हे पात्र रंगवणार आहे. हुमा यात रजनीकांतची मदत करताना दिसणार आहे. नाना पाटेकर या चित्रपटात एका नेत्याच्या भूमिकेत आहे. या नेत्याशी लढताना जरीना रजनीकांतची मदत करणार आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी, नाना पाटेकर यांच्याशिवाय अंजली पाटील, संपथ, रवी काळे, सयाजी शिंदे, पंकज त्रिपाठी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: Humma 'rolled' rolling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.