कार्तिक आर्यनसोबत रोमांस करणार सुशांत सिंग राजपूतची हिरोईन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 04:28 PM2018-07-02T16:28:43+5:302018-07-02T16:38:34+5:30

सोनू के टीटू की स्वीटी चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉलिवूडचा चार्मिंग अभिनेता कार्तिक आर्यनकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे.

Sushant Singh Rajput's heroine to romance Kartik Aryan | कार्तिक आर्यनसोबत रोमांस करणार सुशांत सिंग राजपूतची हिरोईन

कार्तिक आर्यनसोबत रोमांस करणार सुशांत सिंग राजपूतची हिरोईन

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती.

सोनू के टीटू की स्वीटी चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉलिवूडचा चार्मिंग अभिनेता कार्तिक आर्यनकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. नुकतेच आपल्याला आयफा अवॉर्डसचे अँकरिंग करताना तो दिसला होता. लवकरच तो आणखीन एक चित्रपटात दिसणार असल्याचे समजतेय.  सूत्रांच्या माहितीनुसार दिनेश विजन यांच्या आगामी 'लुका छिपी' चित्रपटात कार्तिक दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर झळकणार असल्याची चर्चा होती मात्र आता यात कार्तिकसोबत क्रिती सॅनन रोमांस करताना दिसणार असल्याचे कळतेय.  


'लुका छिपी' हा चित्रपट छोट्या शहरातल्या लव्ह स्टोरीवर आधारित आहे. यासंदर्भात रोहन सिप्पींनी कार्तिकची भेट सुद्धा घेतली आहे. दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटात कार्तिक एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. आधी या चित्रपटाचे नाव मथुरा लाईव्ह ठेवण्याचा विचार करत होते मात्र त्यानंतर 'लुका छिपी' हे न नाव फायनल करण्यात आले.   


कार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो. ‘सोनू के टीटू की स्वीटी’. होय, कुणालाही अपेक्षित नसताना या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अशी काही कमाई केली की, सर्वच चकित झालेत. भारतीय बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 70 कोटींची कमाई केली आहे. वर्ल्ड वाईड बॉक्सआॅफिसचे म्हणाल तर या चित्रपटाचे कलेक्शन 100 कोटींवर पोहोचला. 

 

Web Title: Sushant Singh Rajput's heroine to romance Kartik Aryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.