​काय म्हणता, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यनला भन्साळींची आॅफर??

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 10:12 AM2018-04-15T10:12:19+5:302018-04-15T15:42:19+5:30

‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यन सध्या जाम चर्चेत आहे. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कार्तिकच्या ‘सोनू के टीटू ...

What do you say, 'Sonu's tattoo ki sweeti' fame Kartik Aryan gets Bhansali? | ​काय म्हणता, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यनला भन्साळींची आॅफर??

​काय म्हणता, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यनला भन्साळींची आॅफर??

googlenewsNext
ोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यन सध्या जाम चर्चेत आहे. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कार्तिकच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अनपेक्षित यश मिळवले. केवळ इतकेच नाही तर यातील कार्तिकच्या अभिनयानेही सर्वांना  प्रभावित केले. होय, अगदी बॉलिवूडचे टॉप डायरेक्टर संजय लीला भन्साळी हे सुद्धा कार्तिकचा अभिनय पाहून सुखावले.  ताजी खबर खरी मानाल तर, कार्तिकची हीच प्रतिभा पाहून भन्साळींनी त्याला आपल्या एका आगामी चित्रपटासाठी  साईन करण्याचा निर्णय   घेतलाय.
नुकतीच कार्तिकने संजय लीला भन्साळींची भेट घेतली. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी कार्तिकने भन्साळींची भेट घेतली होती. यानंतर अगदी अलीकडे तो पुन्हा भन्साळींच्या आॅफिसमधून बाहेर पडताना दिसला. या भेटीत एका नव्या प्रोजेक्टवर चर्चा झाल्याचे कळते. अर्थात अद्याप काहीही फायनल झालेले नाही. सूत्रांचे मानाल तर ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील कार्तिकचे काम भन्साळींना प्रचंड आवडले आणि त्यांनी त्याला आपल्या नव्या चित्रपटाची आॅफर दिली. त्यामुळे सगळे काही जुळून आले तर भन्साळींच्या आगामी रोमॅन्टिक चित्रपटात कार्तिक दिसेल. 
खरे तर कार्तिकसोबत काम करण्याची भन्साळींची बºयाच दिवसांपासूनची इच्छा आहे. काही दिवसांपूर्वी साहिर लुधियाणवी आणि अमृता प्रीतम यांच्या आयुष्यावरच्या चित्रपटावर भन्साळींनी काम सुरू केले होते. या चित्रपटातील एक  भूमिका त्यांनी कार्तिकला आॅफर केली होती. अर्थात हा चित्रपट नंतर थंडबस्त्यात पडला. आता पुन्हा एकदा भन्साळी कार्तिकला कास्ट करू इच्छित आहे. असे झाले तर भन्साळी व कार्तिकची ही जोडी धम्माल करणार, यात शंका नाही.
कार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो.

ALSO READ : करिना कपूरसोबत फ्लर्ट करू पाहणा-या कार्तिक आर्यनची लोकांनी अशी घेतली मजा!

Web Title: What do you say, 'Sonu's tattoo ki sweeti' fame Kartik Aryan gets Bhansali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.