बेशिस्त वाहनचालकावर भडकला रणवीर सिंग! वाहनचालक म्हणाला, बदतमीज इन्सान,पहले तमीज सीख!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:47 AM2018-09-05T09:47:17+5:302018-09-05T09:47:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आता अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चालत्या गाडीतून रणवीर एका व्यक्तीवर जोरजोरात ओरडत असताना या व्हिडिओत दिसतोय.

ranveer singh loses his cool and blasts a man for rash driving | बेशिस्त वाहनचालकावर भडकला रणवीर सिंग! वाहनचालक म्हणाला, बदतमीज इन्सान,पहले तमीज सीख!!

बेशिस्त वाहनचालकावर भडकला रणवीर सिंग! वाहनचालक म्हणाला, बदतमीज इन्सान,पहले तमीज सीख!!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आता अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चालत्या गाडीतून रणवीर एका व्यक्तीवर जोरजोरात ओरडत असताना या व्हिडिओत दिसतोय. हा व्हिडिओ आहे, मुंबईतला. बेशिस्त व भरधाव वाहन चालवल्यामुळे रणवीर या व्यक्तीवर ओरडत आहे. मुंबईच्या रस्त्यावर बेशिस्त वाहनचालक पाहून रणवीर भडकला आणि चालत्या गाडीतून त्याने या चाहनचालकाला बरेच काही सुनावले, असा हा एकूण मामला आहे. पण खरी बातमी पुढे आहे. 



होय, रणवीरच्या संतापाचा सामना कराव्या लागलेल्या संबंधित वाहनचालकाने स्वत:चं हा व्हिडिओ पोस्ट केला असून रणवीरला ‘बदतमीज इन्सान’ संबोधले आहे. या वाहनचालकाचे नाव अकुआरियासंदेश असे आहे. ‘ बदतमीज इन्सान, बात करने की तमीज नही. तुम जैसे इन्सान को ये भी नहीं पता की माँ बहन के सामने इतनी गाली कौन देता है. पागल इन्सान, अगर यही अ‍ॅटीट्यूड रहा तो जल्दी ही सडक पर आ जाऐगा. पहले लोगो से बात करने की तमीज सीख. फिर हिरो बनना़ फ्लॉप अ‍ॅक्टर,’ अशा शब्दांत या वाहनचालकाने आपला राग व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ संबंधित वाहनचालकानेच बनवला असून त्यानेच पोस्ट केला. रणवीर या व्हिडिओतील व्यक्तीवर भडकला आहे तर ती व्यक्ती त्याला शांत राहण्यास सुचवत आहे. आता हा व्हिडिओ तुम्हीही बघा आणि यातले बरे-वाईट तुम्हीच सांगा.
काही दिवसांपूर्वी अनुष्काचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रस्त्यावर प्लास्टिक फेकणाऱ्या एका व्यक्तीला अनुष्का चालत्या गाडीतून सुनावले होते.  पुढे या व्हिडिओवरून बरेच रामायण घडले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील अरहान सिंग नामक तरूणाने अनुष्कालाही खरमरीत उत्तर दिले होते. मी फेकलेल्या कच-यापेक्षा तुझ्या तोंडून निघणारा कचरा जास्त होता, असे त्याने अनुष्काला बजावले होते. केवळ इतकेच नाही तर यानंतर अरहानची आई गीतांजली यांनीही अनुष्का व विराट यांना फैलावर घेतले होते. तुम्ही अनुष्का व विराट तुमच्या घरचे असाल. रस्त्यावर तुम्ही केवळ सामान्य नागरिक आहात, याचे भान ठेवा, अशा शब्दांत तिने अनुष्का व विराटला झापले होते. 

Web Title: ranveer singh loses his cool and blasts a man for rash driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.