Anushka Sharma, who was born in a big way, has a special relationship with Bollywood. Working with Shah Rukh! | ​ अनुष्का शर्माने ज्याला भररस्त्यात झापले त्या तरूणाचे आहे बॉलिवूडशी खास नाते! शाहरूखसोबत केलेयं काम!!

रस्त्यावर प्लास्टिकची बाटली फेकणा-या तरूणास अनुष्का शर्माने भररस्त्यात सुनावले आणि अनुष्काचा पती विराट कोहलीने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. पुढे या व्हिडिओवरून बरेच रामायण घडले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील अरहान सिंग नामक तरूणाने अनुष्कालाही खरमरीत उत्तर दिले होते. मी फेकलेल्या कच-यापेक्षा तुझ्या तोंडून निघणारा कचरा जास्त होता, असे त्याने अनुष्काला बजावले. केवळ इतकेच नाही तर यानंतर अरहानची आई गीतांजली यांनीही अनुष्का व विराट यांना फैलावर घेतले. तुम्ही अनुष्का व विराट तुमच्या घरचे असाल. रस्त्यावर तुम्ही केवळ सामान्य नागरिक आहात, याचे भान ठेवा, अशा शब्दांत तिने अनुष्का व विराटला झापले. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. होय, अनुष्काने ज्या तरूणाला भररस्त्यावर झापले, तो अरहान सिंग कुणी सामान्य तरूण नाही तर बॉलिवूडचा लोकप्रीय एक बाल कलाकार राहिला आहे.होय, अरहान सिंगने ‘इंग्लिश बाबू देसी मॅम’ या चित्रपटात शाहरूखसोबत काम केले आहे. खुद्द अरहानने याचा खुलासा केला आहे. शाहरूखसोबतचा एक फोटो शेअर करत, किती सुंदर दिवस होते ते... असे अरहानने लिहिले आहे.अरहान बॉलिवूडमध्ये सनी सिंग नावाने प्रसिद्ध आहे. त्याने शाहिद कपूरसोबतही ‘पाठशाला’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या अरहान बॉलिवूड इंडस्ट्रीत फार अ‍ॅक्टिव्ह नाही. बॉलिवूडपासून दूर झालेला अरहान सध्या एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो. तो एक फॅशन डिझाईनरही आहे.

ALSO READ : तुम्ही तुमच्या घरी अनुष्का शर्मा, विराट कोहली असाल! ‘त्या’ युवकाच्या संतापलेल्या आईने सुनावली खरीखोटी!

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, अरहानने शेखर सुमनसोबत ‘देख भाई देख’ या सुपरहिट शोमध्येही काम केले आहे. अनुष्का पती विराट कोहलीसह आपल्या कारने दिल्लीत प्रवास करत  असताना समोरच्या गाडीतील एका व्यक्तीने रिकामी पाण्याची बाटली बाहेर फेकली होती. हे पाहून चिडलेल्या अनुष्काने त्या गाडीतील युवकाला भररस्त्यात सुनावले होते. याचा व्हिडिओ विराटने  सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही तासांत या प्रकरणात एक  ट्विस्ट आला होता. होय, ज्या व्यक्तिला अनुष्काने सुनावले होते, त्या व्हिडिओतील व्यक्तिनेही अनुष्काला तितकेच खरमरीत उत्तर दिले होते. अरहान सिंग नामक या व्यक्तिने अनुष्काच्या व्हिडिओचा स्क्रिनशॉट शेअर आपली भूमिका मांडली होती. ‘या पोस्टद्वारे मी कुठलाही फायदा उचलू इच्छित नाही. माझ्या बेजबाबदारपणामुळे जे झाले ते चुकीचेच आहे. मी निष्काळजीपणे प्लास्टिकचा एक तुकडा कारबाहेर फेकला होता. पण अनुष्काने आपल्या कारच्या खिडकीची काच खाली करून माझ्यावर एखाद्या वेड्यागत ओरडणे सुरू केले. मी माझ्या चुकीसाठी माफी मागितली. अनुष्का शर्मा कोहली, तुझी भाषा थोडी सभ्य असतील तर तुझी स्टार म्हणून असलेली उंची कमी झाली नसती. माणसात स्वच्छतेच्या जाणीवेसोबतचं थोडी सभ्यताही असायला हवी. माझ्या कारमधून मी फेकलेला प्लास्टिकचा तुकडा तुझ्या तोंडून निघालेल्या कच-यापेक्षा कमीचं होता, असे या व्यक्तिने अनुष्काला उद्देशून लिहिल् होते. 
Web Title: Anushka Sharma, who was born in a big way, has a special relationship with Bollywood. Working with Shah Rukh!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.