जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन'चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 04:23 PM2018-08-02T16:23:26+5:302018-08-02T16:31:59+5:30

बॉर्डर' आणि 'एलओसी' यांसारख्या देशभक्तीपर सिनेमाचे दिग्दर्शक जे.पी. दत्ता 'पलटन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाची कथा भारत व चीन युद्धावर आधारीत आहे.

J.P. Datta's 'Paltan' trailer-out | जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन'चा ट्रेलर आऊट

जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन'चा ट्रेलर आऊट

ठळक मुद्दे 7 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहेदिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी तब्बल बारा वर्षांनंतर 'पलटन' सिनेमातून पुनरागमन करत आहे

बॉर्डर' आणि 'एलओसी' यांसारख्या देशभक्तीपर सिनेमाचे दिग्दर्शक जे.पी. दत्ता 'पलटन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाची कथा भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. जे. पी. दत्ता पुन्हा एकदा देशाचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ट्रेलरला बघून सिनेमाची क्रेझ वाढेल. सिनेमात जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सिद्धांत कपूर, सोनू सूद. हर्षवर्धन राणे आणि गुरमीत चौधरीसारखे अनेक कलाकार आहेत. चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 7 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी ११ सप्टेंबरला सिक्कीम सीमेवर भारत-चीन युद्ध सुरू झाले होते. हा मल्टीस्टारर असून काही दिवसांपूर्वी या सिनेमांतील पात्रांचे लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत.तसेच या चित्रपटात अभिनेत्री ईशा गुप्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'पलटन' चित्रपटातील कलाकारांचा लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी तब्बल बारा वर्षांनंतर 'पलटन' सिनेमातून पुनरागमन केले आहे.


'पलटन' सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर व एलओसी या सिनेमांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात बर्फाळ पर्वत सर करत असताना सैनिक वंदे मातरमचे नारे देताना दिसत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमाबाबतची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.  

Web Title: J.P. Datta's 'Paltan' trailer-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.