Gauri Khan Birthday: कधी काळी गौरीने शाहरुख खानचे नाव ठेवले होते अभिनव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:17 PM2018-10-08T12:17:50+5:302018-10-08T12:44:52+5:30

गौरी खान आज आपला 48 वा बर्थ डे सेलिब्रेट करतोय. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच शानदार निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे.

Garuri Khan Birthday- once upon time gauri khan was given name Abhinav to Shahrukh Khan | Gauri Khan Birthday: कधी काळी गौरीने शाहरुख खानचे नाव ठेवले होते अभिनव

Gauri Khan Birthday: कधी काळी गौरीने शाहरुख खानचे नाव ठेवले होते अभिनव

googlenewsNext
ठळक मुद्देगौरी खान आज आपला 48 वा बर्थ डे सेलिब्रेट करतेयगौरीचे नाव फॉर्च्युच्या 50 पावरफुल भारतीय महिल्यांच्या यादीत सामील झाले आहे

गौरी खान आज आपला 48 वा बर्थ डे सेलिब्रेट करतेय. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच शानदार निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. गौरीने रणबीर कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण धवनच्या घराचे इंटीरियर केले आहे. गौरीचे नाव फॉर्च्युच्या 50 पावरफुल भारतीय महिल्यांच्या यादीत सामील झाले आहे. गौरीने यात 42वे स्थान मिळवले आहे. गौरीने स्वत: ही माहिती आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे.   

गौरी शाहरुखसोबत तेव्हापासून आहे ज्यावेळी तो सुपरस्टार बनला नव्हता. खरं तर लग्नानंतर शाहरुखने सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. संदीप खोसलाला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान गौरीने सांगितले होते की, हा प्रवास खूपच सुंदर होता. मी ज्यावेळी मुंबईत आले होते सुरुवातीला माझ्यासाठी सगळं जुळवून घेणे थोडे कठीण होते. मात्र मी तो ही प्रवास एन्जॉय केला. 

गौरीसाठी सगळ्यात कठीण होते ते आपल्या आई-वडिलांना पटवून देणे की शाहरुख तिच्यासाठी परफेक्ट आहे. गौरी हिंदू तर शाहरुख मुस्लिम होता हीच गोष्ट सगळ्यात मोठा अडथळा होती. त्यामुळे त्या दोघांनी मिळून एक निर्णय घेतला त्याचे नाव शाहरुख वरून अभिनव केले जेणेकरून तो हिंदू म्हणून ओळखला जाईल. 

गौरी यांच इंटरव्हु्यमध्ये पुढे म्हणाली होती की, आम्ही वयाने लहान होता. त्यात शाहरुख मुस्लिम होता पुढे जाऊन फिल्म इंडस्ट्री जॉईन करणार होता त्यामुळे माझे आई-वडील यासाठी तयार नव्हते, आम्ही एवढे बालिश होतो की तो हिंदू  ओळखला जावा म्हणून त्याचे नाव अभिनव म्हणून सांगितले. 

Web Title: Garuri Khan Birthday- once upon time gauri khan was given name Abhinav to Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.