काय ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख करतेय ‘या’ को-स्टारला डेट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:54 AM2018-07-11T09:54:38+5:302018-07-11T09:58:29+5:30

‘दंगल’ या चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी फातिमा सना शेख प्रेमात पडल्याची खबर आहे. होय, फातिमा इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे मानले जात आहे. 

is fatima sana shaikh dating dangal co-star aparshakti khurana | काय ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख करतेय ‘या’ को-स्टारला डेट?

काय ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख करतेय ‘या’ को-स्टारला डेट?

googlenewsNext

‘दंगल’ या चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी फातिमा सना शेख प्रेमात पडल्याची खबर आहे. होय, फातिमा इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे मानले जात आहे. किंबहुना हा अभिनेता ‘दंगल’मध्ये तिचा को-स्टार राहिलेला आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा.

अपारशक्ती हा अभिनेता आयुष्यमान खुराणाचा भाऊ आहे. ‘दंगल’मध्ये त्याने फातिमाच्या कझिनची भूमिका साकारली होती. सध्या याच अपारशक्तीसोबत फातिमा फिरताना दिसतेय. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे.

फातिमाने ‘दंगल’मध्ये गीता फोगटची भूमिका साकारली होती. तर अपारशक्ती तिचा चुलत भाऊ ओमकारच्या भूमिकेत दिसला होता. तूर्तास हे दोघेही आपआपल्या कामात बिझी आहेत. 

फातिमा आमिर खानसोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये व्यस्त आहे. तर अपारशक्तीकडे ‘स्त्री’ आणि ‘हॅपी फिर भाग जाएगी’ हे दोने मोठे सिनेमे आहेत. पण तरिही वेळात वेळ काढून दोघेही एकमेकांसोबत भेटताना दिसताहेत. आता या दोघांमध्ये काय खिचडी शिजतेय, ते तर त्यांनाच ठाऊक. पण दोघांमधील केमिस्ट्री मात्र कुणापासूनही लपून राहिलेली नाही, हे मात्र खरे.

 फातिमाचा ‘दंगल’  हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटानंतर आमिरच्या पुण्याईने फातिमाला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मिळाला. आमिरनेच यशराज फिल्म्सकडे फातिमाची शिफारस केली होती. यास्रदरम्यान ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मध्ये फातिमाला कास्ट केल्यामुळे आमिरची पत्नी किरण राव नाराज असल्याची बातमीही  आली होती. त्याआधी तर फातिमा व आमिरबद्दल वेगळीच चर्चा रंगली होती.  आमिर व फातिमाच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या दबक्या आवाजात सुरु होत्या. दोघेही परस्परांच्या बरेच जवळ आले आहेत आणि हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय, अशी ही चर्चा  होती. या बातम्यांनी किरण राव अस्वस्थ असल्याचेही कानावर आले होते. 

 

Web Title: is fatima sana shaikh dating dangal co-star aparshakti khurana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.