Fatima Sana Sheikh in Aamir Khan's 'Dream Project'? | ​आमिर खानच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्येही फातिमा सना शेख?

फातिमा सना शेख ही आमिर खानची आवडती अभिनेत्री, यात काही शंका नाही.  त्यामुळेच ‘दंगल’नंतर लगेच आमिरने तिला आपल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कास्ट केले. ‘दंगल’मध्ये आमिर व फातिमा या दोघांनी बाप-लेकीची भूमिका साकारली होती. पण  ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिर व फातिमा दोघेही कथितरित्या एकमेकांशी रोमान्स करताना दिसणार आहेत. खरे तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये फातिमाला कास्ट केल्यामुळे आमिरची पत्नी किरण राव नाराज असल्याची बातमीही मध्यंतरी आली होती. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट केवळ आणि केवळ आमिरच्या शिफारसीमुळे फातिमाला मिळाला, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी जोरात होती. त्याच्या काही दिवस आधीपासून आमिर व फातिमाच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या दबक्या आवाजात सुरु होत्या. दोघेही परस्परांच्या बरेच जवळ आले आहेत आणि हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय, अशीही चर्चा रंगली होती. या बातम्यांनी किरण राव अस्वस्थ असल्याची खबर होती. या बातमीत किती तथ्य आहे, हे आम्हाला माहित नाही. पण आता फातिमाने एक नवा संकेत दिला आहे. होय, हा संकेत कुठला तर आमिरसोबतच्या नव्या चित्रपटाबद्दलचा.फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती महाभारत वाचत असल्याचे दिसते आहे. याच फोटोवरून आमिरच्या पुढच्या चित्रपटात फातिमाची वर्णी लागणार, असे मानले जात आहे. होय, महाभारतावर चित्रपट आणणे, हे आमिरचे स्वप्न आहे. या ड्रिम प्रोजेक्टबद्दल आमिर अलीकडे खूपदा बोलला आहे. चर्चा खरी मानाल तर आमिर व त्याच्या लेखकांच्या टीमने याची तयारीही सुरु केली आहे. पुण्याच्या लायब्ररीत असतील नसतील तितकी महाभारतावरील  पुस्तके आमिर व त्याची टीम वाचत सुटली आहे. आमिरचा हा ड्रिम प्रोजेक्ट सहा ते सात भागांत असेल, असेही कळतेय. 
‘महाभारतावर चित्रपट हे माझे स्वप्न आहे. पण यासाठी मला माझ्या आयुष्याची १५ ते २० वर्षे द्यावी लागतील, हे मी जाणतो आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट हाती घेण्यास घाबरतो,’ असे अलीकडे आमिर म्हणाला होता. पण कदाचित आमिरने हे काम मनावर घेतले आहे आणि याच काळात फातिमा महाभारत वाचत आहे, म्हटल्यावर नक्कीच काही तरी शिजतेय.
Web Title: Fatima Sana Sheikh in Aamir Khan's 'Dream Project'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.