Deepika Padukone Ranveer Singh Wedding: चुकुनही पाहायला विसरू नका दीपवीरच्या लग्नाआधीचे हे क्षण !!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:54 PM2018-11-14T14:54:09+5:302018-11-14T14:54:42+5:30

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा लग्नसोहळा सुरू झाला आहे. इटलीच्या लेक कोमो येथे अगदी काही क्षणात दीपिका व रणवीर लग्नगाठ बांधतील. ताज्या अपडेट्सनुसार, दोन्हींकडचे व-हाडी लग्नमंडपात पोहोचले आहेत.

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: deepika padukone and ranveer singh wedding two video leak | Deepika Padukone Ranveer Singh Wedding: चुकुनही पाहायला विसरू नका दीपवीरच्या लग्नाआधीचे हे क्षण !!

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: चुकुनही पाहायला विसरू नका दीपवीरच्या लग्नाआधीचे हे क्षण !!

googlenewsNext

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा लग्नसोहळा सुरू झाला आहे. इटलीच्या लेक कोमो येथे अगदी काही क्षणात दीपिका व रणवीर लग्नगाठ बांधतील. ताज्या अपडेट्सनुसार, दोन्हींकडचे व-हाडी लग्नमंडपात पोहोचले आहेत. वेडिंग वेन्यू ७०० वर्षे जुना आहे.  संपूर्ण लग्नमंडप वॉटर लीलीच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. ही फुले दीपिकाची आवडती फुले आहेत. वेडिंग वेन्यू एक म्युझियम आहे. याठिकाणी थांबण्यास खोल्या नाहीत. याचमुळे दीपवीर आणि त्यांचे कुटुंबीय वेडिंग वेन्यूपासून काही दूर अंतरावर मुक्कामास आहेत. दीपिका व रणवीरचे लग्न भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी २ ते ५ या वेळात होणार आहे. 


दीपवीर आपले लग्न अतिशय खासगी ठेवू इच्छितात. त्यामुळे याठिकाणचा एकही फोटो बाहेर येऊ नये, यासाठी लग्नस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अर्थात लग्नापूर्वी दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोन्ही व्हिडिओत रणवीर धम्माल करतोय. पहिल्या व्हिडिओत तो खली-बली गाण्यावर थिरकतांना दिसतोय. या व्हिडिओत त्याने क्रिम कलरचा पायजामा व मरून रंगाचा कोट घातला आहे. 


दुस-या व्हिडिओत रणवीर सर्व पाहुण्यांसोबत मस्तीमूडमध्ये दिसतो आहे. यात तो छम्मा छम्मा गाण्यावर डान्स करतोय.
रणवीरचे हे दोन्ही व्हिडिओ चाहत्यांसाठी ट्रिट आहेत. लग्नाचे फोटो दीपवीर स्वत: सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. अर्थात त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Deepika Padukone Ranveer Singh Wedding: deepika padukone and ranveer singh wedding two video leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.