वाद झाल्याने 'या' बॉलिवूड चित्रपटांना मिळाली प्रसिद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 03:32 PM2019-02-26T15:32:47+5:302019-02-26T15:35:40+5:30

म्यूझिकच्या कॉपीराइट इश्यूवर देखील भंसालीने नाव या इंडस्ट्रीत चर्चिले जाते. त्यांचे असेच काही चित्रपट आहेत जे कोणत्याना कोणत्या कारणांनी वादात सापडले. मात्र या वादामुळे चित्रपटांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत.

Bollywood Movies Got Publicity Due To Controversy! | वाद झाल्याने 'या' बॉलिवूड चित्रपटांना मिळाली प्रसिद्धी!

वाद झाल्याने 'या' बॉलिवूड चित्रपटांना मिळाली प्रसिद्धी!

googlenewsNext

रवींद्र मोरे 

बॉलिवूडमध्ये जर टॉप लेवरवर जर एखाद्या विवादित प्रोड्यूसर-डायरेक्टरबाबत विचार केला तर संजय लीला भंसालीचे नाव अग्रस्थानी येते. भंसाली कधी आपल्या चित्रपटाच्या कथेमुळे चर्चेत राहतो तर कधी कधी चित्रपटातील अ‍ॅक्टर-अ‍ॅक्ट्रेसच्या कारणाने. एवढेच नव्हे तर म्यूझिकच्या कॉपीराइट इश्यूवर देखील भंसालीने नाव या इंडस्ट्रीत चर्चिले जाते. त्यांचे असेच काही चित्रपट आहेत जे कोणत्याना कोणत्या कारणांनी वादात सापडले. मात्र या वादामुळे चित्रपटांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत.

* हम दिल दे चुके सनम


१९९९ मध्ये रिलीज झालेला 'हम दिल दे चुके सनम' हा त्या वर्षाचा सर्वात हिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्याची केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. सलमान आणि ऐश्वर्या दरम्यान सुरु असलेल्या अफेअरच्या बातम्यांवरुनदेखील हा चित्रपट यशस्वी ठरला. सलमानच्याच कारणाने ऐश्वर्याला हा चित्रपट मिळाला होता. संजय लीला भंसाली सलमानचा खास जवळचा मित्र होता आणि त्याच्याच सांगण्यावरुन ऐश्वर्याला मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी साइन करण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगसोबतच दोन्हीही एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. मात्र काही काळानंतर सलमान - ऐश्वर्याचे भांडण चर्चिले जाऊ लागले होते.  

* देवदास


२००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘देवदास’ ने शाहरुख खानचे स्टार्स चमकविले होते. या चित्रपटातील शाहरुखच्या अ‍ॅक्टिंगचे प्रत्येकजण घायाळ झाले होते. हा चित्रपट रिलीज होताना खूपच चर्चिला गेला होता. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन मल्टीस्टारर या चित्रपटाने ५ नॅशनल अवॉर्ड आपल्या नावे केले होते. या अगोदर आलेले ‘देवदास’चे सर्व व्हर्जन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट होते, मात्र २००२ मध्ये आलेला हा पहिला कलर चित्रपट होता. या चित्रपटास सुमारे ५० कोटी खर्च आला होता. चंद्रमुखीचा कोठा बनविण्यासाठीच १२ कोटी खर्च झाले होते. शिवाय चित्रपटाचे सहा सेट बनविण्यासाठी २० कोटी लागले होते. ज्या घरात ऐश्वर्याचे सीन्स शूट झाले होते, त्यात १.२२ लाख काचेचे तुकडे जोडून तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे पावसाच्या सीननंतर त्याला पुन्हा पेंट करावे लागायचे.    

* साँवरिया


२००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘सांवरिया’ द्वारा सोनम कपूर आणि रणबीर कपूरचे डेब्यू केला होता. रणबीरने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, पहिल्या चित्रपटासाठी त्याला काहीही मानधन मिळाले नव्हते. दोघांचाही डेब्यू चित्रपट असल्याने चित्रपटसृष्टीत खूपच मोठा सेट लावला होता आणि त्यात सलमान खान आणि राणी मुखर्जीलाही घेण्यात आले होते. मात्र चित्रपटास फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र तरीही हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात होता.

* गोलियों की रासलीला रामलीला


हा चित्रपट शीर्षकामुळे वादात सापडला होता. २०१२ मध्ये या चित्रपटाच्या सेटवर 'अंग लगा दे..’ हे गाणे चित्रीत केले होते. यात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांना गाण्याच्या शेवटी एक किसिंग सीन चित्रीत करायचे होते. याच्या शूटिंगदरम्यान दोन्ही डायरेक्टर्सने कट सांगितल्यानंतरदेखील ते एकमेकांना किस करतच राहिले. त्या रात्री सेटवर सुमारे ५० जण हजर होते आणि हे सर्व पाहून सर्वच चकित झाले होते. या किसनंतर निश्चित झाले होते की, दोघेजण एकमेकांच्या प्रेमात आहेत.

Web Title: Bollywood Movies Got Publicity Due To Controversy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.