आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:26 PM2018-11-01T19:26:36+5:302018-11-01T19:33:48+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहे.

Aamir Khan will be seen on the Google map, as 'Firangi Bhalla' | आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट

आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट

googlenewsNext
ठळक मुद्देआमीर 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'मध्ये फिरंगी भल्लाच्या भूमिकेत‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ चित्रपट ८ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन कुठेही कमी पडू नये यासाठी स्वतः आमीर खान प्रयत्न करतो आहे. यासाठी गुगल मॅपवर त्याची खास एन्ट्री होणार आहे.

आमीर 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'मध्ये 'फिरंगी भल्ला' ही भूमिका साकारताना दिसणार आहे हे पात्र आता गुगल मॅपवर रस्ते दाखविण्यात मदत करणार आहे. चित्रपटाच्या टीमने गुगल मॅप्ससोबत ही योजना आखली आहे. हा चित्रपटाच्या मार्केटिंगचाच भाग असल्यामुळे आजपासून आमीरचे हे पात्र प्रत्येकाच्या गुगल मॅपवर दिसणार आहे. गुगल मॅपचे वापरकर्ते त्यांच्या अॅन्ड्राईड किंवा आयओएस स्मार्टफोनवर या फिरंगीसोबत प्रवास करण्याचा पर्याय निवडू शकतात. या सगळ्यात 'फिरंगी भल्ला' हा गाढवावार बसून वापरकर्त्यांसोबत प्रवास करताना दिसणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आमीरचा हा लूक त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. 


‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला रिलीज होतोय. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
 

Web Title: Aamir Khan will be seen on the Google map, as 'Firangi Bhalla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.