डान्सिग अंकल संजीव श्रीवास्तव यांना लागली 'लॉटरी', मिळाली ही मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:11 IST2018-06-07T14:09:53+5:302018-06-07T14:11:14+5:30

संजीव श्रीवास्तव यांचे लाखो चाहते झाले आहेत. संजीव श्रीवास्तव यांच्या एका डान्स व्हिडीओमुळे ते रातोरात स्टार झाले. आता त्यांची मोठी लॉटरी लागली आहे.

Sanjeev Srivastav got first advertisment, Govinda style dance viral | डान्सिग अंकल संजीव श्रीवास्तव यांना लागली 'लॉटरी', मिळाली ही मोठी ऑफर

डान्सिग अंकल संजीव श्रीवास्तव यांना लागली 'लॉटरी', मिळाली ही मोठी ऑफर

मुंबई : सोशल मीडियात आपल्या धमाकेदार डान्स स्टेप्सने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारे डान्सिग अंकल संजीव श्रीवास्तव यांचे लाखो चाहते झाले आहेत. संजीव श्रीवास्तव यांच्या एका डान्स व्हिडीओमुळे ते रातोरात स्टार झाले. आता त्यांची मोठी लॉटरी लागली आहे. 

संजीव श्रीवास्तव यांना बॉलिवूडमधून काही ऑफर आल्याचीही चर्चा होत होती. इतकेच काय तर ते अभिनेता सुनील शेट्टीलाही येऊन भेटले होते. आता त्यांना एकाचवेळी दोन कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातीसाठी साईन केलं आहे. इतकेच नाहीतर सुनील शेट्टीची कंपनी F the Couch सुद्धा त्यांना कास्ट करणार आहे. ही माहिती स्वत: संजीव यांनी ट्विट करुन दिली. 


संजीव श्रीवास्तव यांना बजाज इन्शुरन्स कंपनीने एका जाहीरातीसाठी साईन केलं आहे. या जाहीरातीचा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Web Title: Sanjeev Srivastav got first advertisment, Govinda style dance viral