धमाका! डान्सिंग अंकल सलमान खानसोबत स्क्रिनवर झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:02 IST2018-06-08T15:00:48+5:302018-06-08T15:02:03+5:30
एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर श्रीवास्तव हे रातोरात स्टार झाले.

धमाका! डान्सिंग अंकल सलमान खानसोबत स्क्रिनवर झळकणार
मुंबई : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्याने काहीतरी करुन रातोरात स्टार व्हावं. पण प्रत्येकाच्या नशीबात हे नसतं. मात्र मध्यप्रदेशमधील संजीव श्रीवास्तव यांचं नशीब असंच पालटलं आहे. एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर श्रीवास्तव हे रातोरात स्टार झाले. आणि एकापाठी एक मोठ्या ऑफर त्यांना मिळू लागल्या.
संजीव श्रीवास्तव यांच्यासोबतच त्यांच्या मुलालाही ऑफर मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी संजीव हे अभिनेता सुनील शेट्टी याला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. त्यांना हेराफेरी 3 मध्ये ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. आता संजीव श्रीवास्तव हे सलमान खानसोबतही स्क्रिनवर झळकणार आहेत.
Me & My Family with @BeingSalmanKhan Bhai on sets of @duskadum2018@SonyTV#DancingUncle#SalmanKhan#SanjeevShrivastava#SanjeevSrivastva#Aapkeaajanese#India#GovindaUncle#Bollywoodpic.twitter.com/Ep3pIus6cl
— Sanjeev Shrivastava (@DabbutheDancer) June 7, 2018
संजीव श्रीवास्तव यांनी त्यांचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यात ते आणि त्यांचा परिवार सलमान खानसोबत दिसणार आहे. त्यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की, त्यांनी दस का दमसाठी शूटिंग केलं. या खास एपिसोडमध्ये डब्बू अंकल हे डान्स करताना दिसणार आहे.