प्रभास आणि अनुष्काच्या रिलेशनशिपबाबत नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 10:25 IST2018-05-17T10:24:07+5:302018-05-17T10:25:29+5:30

दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही. पण त्यांच्या या गप्प असण्यावर त्यांच्या फॅन्सना विश्वास नाहीये. फॅन्सनी त्या दोघांना नेहमीच एका जोडीच्या रुपात पाहिलंय.

Prabhas and Anushka Shetty are very much in love relationship | प्रभास आणि अनुष्काच्या रिलेशनशिपबाबत नवा खुलासा

प्रभास आणि अनुष्काच्या रिलेशनशिपबाबत नवा खुलासा

मुंबई : गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'बाहुबली 2' नंतर अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा झाली. दोघे लग्न करणार अशाही चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही. पण त्यांच्या या गप्प असण्यावर त्यांच्या फॅन्सना विश्वास नाहीये. फॅन्सनी त्या दोघांना नेहमीच एका जोडीच्या रुपात पाहिलंय.  

प्रभास आणि अनुष्काच्या साखरपुड्याची गेल्यावर्षी चर्चा झाली होती. पण ती अफवा निघाली. पुढे त्यांच्या प्रेमाच्या चर्चा कमी झाल्या. एकीकडे प्रभास साहोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तर दुसरीकडे अनुष्का आपल्या कामात बिझी आहे. त्यामुळे काहींना असं वाटत आहे की, प्रभास आणि अनुष्का यांच्यात काही नाहीये. दोघांच्या प्रेमाची केवळ अफवा होती. 

पण जर तुम्हीही असा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल. कारण प्रभास आणि अनुष्का शेट्टी या दोघांचं नातं आणखी घट्ट होत आहे. बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभास आणि अनुष्का अजूनही एकमेकांना डेट करत आहेत. आणि दोघेही आपल्या नात्याबाबत फार गंभीर आहेत. प्रभास साहोच्या शूटिंगमध्ये कितीही बिझी असला तरी वेळात वेळ काढून तो अनुष्कासोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यामातून बोलत असतो. अनुष्का सुद्धा एका पझेसिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह गर्लफ्रेन्डसारखी साहोच्या शूटिंगची सगळी माहिती ठेवते आहे. म्हणजे दोघांमध्ये अजूनही प्रेम आहे हे यातून बोललं जातंय.

दरम्यान, साहोमध्ये आधी प्रभाससोबत अनुष्का शेट्टी दिसणार होती. पण नंतर श्रद्धा कपूरला कास्ट करण्यात आलं. त्यामुळे आता दोघांचेही चाहते दोघांना एकत्र कधी बघता येईल या प्रतिक्षेत आहेत. 

Web Title: Prabhas and Anushka Shetty are very much in love relationship