असा असणार 'सिंबा' मधील रणवीर लूक, सोशल मीडियात फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 11:14 IST2018-06-18T11:14:29+5:302018-06-18T11:14:49+5:30

रोहित शेट्टीसोबतच करण जोहर या सिनेमाचा सहनिर्माता आहे. तर या सिनेमात सारा अली खान रणवीरसोबत दिसणार आहे. 

New look of Ranveer Singh from Rohit Shetty film Simmba | असा असणार 'सिंबा' मधील रणवीर लूक, सोशल मीडियात फोटो व्हायरल

असा असणार 'सिंबा' मधील रणवीर लूक, सोशल मीडियात फोटो व्हायरल

मुंबई : रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंबा' या सिनेमाचं शूटिंग सध्या जोरात सुरु आहे. त्यावेळी रणवीर सिंगचा लूक समोर आला होता. आता पुन्हा रणवीरचा या सिनेमातील लूक समोर आला आहे. रोहित शेट्टीसोबतच करण जोहर या सिनेमाचा सहनिर्माता आहे. तर या सिनेमात सारा अली खान रणवीरसोबत दिसणार आहे. 

या सिनेमातील रणवीर एक नवा फोटो समोर आला आहे. या फोटोत तो चांगलाच गंभीर दिसत आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम सिनेमातही अजय देवगणचा जवळपास असाच लूक होता. त्याच्या कामालाही मोठी पसंती मिळाली होती. रणवीरचा हा लूक अफलातून दिसत आहे पण त्याचंही काम कसं असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 

रणवीरसोबत या सिनेमात सारा अली खान ही पहिल्यांदाच दिसत आहे. हा साराचा दुसरा सिनेमा आहे. डिसेंबरच्या 28 तारखेला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

Web Title: New look of Ranveer Singh from Rohit Shetty film Simmba