क्रांतीकारकांच्या कार्याला मिळणार उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:43 AM2019-09-05T11:43:39+5:302019-09-05T11:44:00+5:30

नवमहाराष्ट गणेश मंडळ  : मंडळातर्फे ६५ वर्षांपासून साजरा होतोय उत्सव, सामूहिक आरती, अथर्वशीर्ष पठनाचे आयोजन

The work of the revolutionaries will be bright | क्रांतीकारकांच्या कार्याला मिळणार उजाळा

क्रांतीकारकांच्या कार्याला मिळणार उजाळा

googlenewsNext


धुळे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात क्रांतीकारकांचा सिंहाचा वाटा आहे. क्रांतीकारकांनी इंग्रजांविरूद्ध यशस्वी लढा दिला. त्यामुळेच भारत परकीयांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला, आपण स्वतंत्र झालो. या क्रांतीकारकांच्या जीवन कार्याला उजाळा देण्याचे काम  नवमहाराष्टÑ गणेश मंडळ करणार आहे.
धुळे शहरातील जुने अमळनेर स्टॅँड परिसरात गल्ली नं. सहा मध्ये असलेल्या नवमहाराष्टÑ गणेश मंडळाचे हे ६५ वे वर्ष आहे. 
या मंडळाची स्थापना १९५४ मध्ये स्व. चंद्रकांत व्ही. शहा, यशवंत अण्णा कदम, सुरेश खंडू चौधरी, हरीशेठ गोटी यासारख्या ज्येष्ठ मंडळीनंी केली. 
शहरात सजीव आरास सादर करणाºया मंडळांमध्ये या मंडळाचा अग्रक्रम लागत असतो. दरवर्षी या मंडळातर्फे धार्मिक, ऐतिहासिक विषयांवरच आरास केली जाते. त्या माध्यमातून प्रबोधन केले जात असते. 
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात क्रांतीकारकांची भूमिक अतिशय मोलाची ठरलेली आहे. त्यांनी परकीय सत्तेविरूद्ध यशस्वी लढा दिला. क्रांतीकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. क्रांतीकारकांचा हा दैदिप्यमान इतिहास आजच्या पिढीला कळवा,  त्यांनाही क्रांतीकारकांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने नवमहाराष्टÑ गणेश मित्र मंडळातर्फे यावर्षी ‘लढा क्रांतीचा’ हा सजीव देखावा सादर करणार आहे.
यात वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. सुमारे २० मिनीटाची ही सजीव आरास असणार आहे.यात भगतसिंगची व्यक्तिरेखा मल्हार सापे, सुखदेवांची प्रतिक वाघ, राजगुरू यांची व्यक्तीरेखा मयूर प्रविण चौधरी तर चंद्रशेखर आझाद यांची व्यक्तीरेखा कृष्णा प्रविण चौधरी साकारणार आहे. दरम्यान मंडळाचा देखावा ऐतिहासिक असल्याने, मंडळाच्या मंडपासमोर क्रांतीज्योती तसेच क्रांती कारकांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
मंडळातर्फे सामूहिक आरती
स्थापनेच्या सातव्या दिवशी मंडळातर्फे सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात येत असते. यात या परिसरातील सर्वजण सपत्नीक गणरायाची आरती करतात. त्याचबरोबर अथर्वशीर्षाचे पठण करीत असतात. या उपक्रमालाही भरभरून प्रतिसाद मिळत असतो. 
मंडळातर्फे तयार केलेली सजीव आरास शुक्रवारपासून पहावयास मिळणार आहे.
मनपाकडून बक्षीस
गेल्यावर्षी या मंडळातर्फे परिसरात व्यसनमुक्ती, स्वच्छता आदी विषयांवर ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. त्यामुळे या मंडळाला महानगरपालिकेतर्फे पाच हजार रूपयांचे प्रथम बक्षीस देवून गौरविण्यात आले होते.

Web Title: The work of the revolutionaries will be bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.