'फिंच'हिटर! टी-२० क्रिकेटमध्ये मोडला स्वतः चाच रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंचने विश्वविक्रमाला गवसणी घालत इतिहास रचला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 05:51 PM2018-07-03T17:51:21+5:302018-07-03T17:51:44+5:30

whatsapp join usJoin us
T20 Cricket Match: 'Finch' heater! Aron Finch has broken the own record | 'फिंच'हिटर! टी-२० क्रिकेटमध्ये मोडला स्वतः चाच रेकॉर्ड

'फिंच'हिटर! टी-२० क्रिकेटमध्ये मोडला स्वतः चाच रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंचने विश्वविक्रमाला गवसणी घालत इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 लढतीमध्ये फिंचने 172 धावांची तुफानी खेळी साकारत विश्वविक्रम रचला आहे.
फिंचने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात फक्त 76 चेंडूमध्ये 16 चौकार आणि 10 षटकार लगावत 176 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील ही सर्वाधिक धावांची खेळी आहे. यापूर्वी सर्वाधिक धावांचा विक्रम फिंचच्याच नावावर होता. यापूर्वी फिंचने 29 ऑगस्ट 2013 या दिवशी 156 धावांची खेळी साकारली होती. 
फिंचच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 229 अशी मजल मारली आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये दोनदा दीडशे धावांचा टप्पा ओलांडणारा फिंच हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. 

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ९ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १०० धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. 

Web Title: T20 Cricket Match: 'Finch' heater! Aron Finch has broken the own record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.