RCB vs KXIP, IPL 2018 LIVE: Bangalore's decision to win toss | RCB vs KXIP, IPL 2018 : बंगळुरुचा स्पर्धेतील पहिला विजय; पंजाबवर मात
RCB vs KXIP, IPL 2018 : बंगळुरुचा स्पर्धेतील पहिला विजय; पंजाबवर मात

एबी डी'व्हिलियर्सच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद करता आली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.
 

11.38 PM : बंगळुरुचा स्पर्धेतील पहिला विजय; पंजाबवर मात

11.31 PM : मनदीप बाद; बंगळुरुला सहावा धक्का

- डी'व्हिलियर्सनंतर मनदीप संघाला सावरेल असे वाटत होते, पण त्याने धावचीत होत आत्मघात केला

11.28 PM : मोक्याच्या क्षणी डी'व्हिलियर्स बाद

- बंगळुरुला 12 धावांत 10 धावांची गरज होती. पण 18व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी'व्हिलियर्स बाद झाला. त्याने 40 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या.

11.22 PM : डी'व्हिलियर्सचे झुंजार अर्धशतक

 - डी'व्हिलियर्सने अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत आपले अर्धशतक साजरे केले.
 

11.20 PM : डी'व्हिलियर्सचे सलग दोन षटकार

- सतराव्या षटकात मुजीब उर रेहमानला डी'व्हिलियर्सचे सलग दोन षटकार लगावले आणि सामना बंगळुरुच्या बाजूने झुकवला.

11.13 PM : बंगळुरुला विजयासाठी 24 चेंडूंत 41 धावांची गरज

11.09 PM : बंगळुरु 15 षटकांत 4 बाद 109

11.02 PM : बंगळुरुचे 14व्या षटकात शतक पूर्ण

- बंगळुरुला दोन धक्के बसल्यावरही डी'व्हिलियर्सने धावफलक हलता ठेवला, त्यामुळे बंगळुरुला 14 षटकांत 100 धावा करता आल्या.

10.51 PM : सलग दुसऱ्या चेंडूवर अश्विनला बळी

- बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अश्विनने क्विंटन डी' कॉकला बाद केले, त्यानंतरच्या चेंडूवर त्याने सर्फराझ खानला तंबूत धाडले.

10.50 PM : बंगळुरुला धक्का; क्विंटन डी' कॉक OUT

- दमदार फलंदाजी करत असलेल्या क्विंटन डी' कॉकला आर. अश्विनने बाद केले. क्विंटन डी' कॉकने 45 धावा केल्या.

10.33 PM : मोहित शर्माच्या एका षटकात 16 धावांची वसूली

- मोहित शर्माच्या पहिल्या चेंडूवर डी'व्हिलियर्सने षटकार ठोकला होता, त्याच्या पहिल्या षटकात बंगळुरुच्या फलंदाजांनी 16 धावा लूटल्या.

10.30 PM : डी'व्हिलियर्सकडून मोहित शर्माचे षटकाराने स्वागत

- आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी'व्हिलियर्सने दमदार षटकार लगावत मोहित शर्माचे स्वागत केले, मोहितचा हा सामन्यातील पहिलाच चेंडू होता.

10.025 PM : पंजाब 6 षटकांत 2 बाद 42

10.20 PM : विराट कोहली OUT; बंगळुरुला मोठा धक्का

- युवा फिरकीपटू मुजीव उर रेहमानने कोहलीचा अप्रतिम त्रिफळा उडवला. बंगळुरुसाठी हा मोठा धक्का होता.

10.02 PM : बंगळुरुला दुसऱ्याच चेंडूवर धक्का

- अक्षर पटेलने पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बंगळुरुच्या ब्रेंडन मॅक्युलमला बाद केले.

9.45 PM : पंजाबचा संघ ALL OUT

- किंग्ज इलेव्हन पंजाबचा लोकेश राहुल आयपीएलमध्ये पुन्हा एकदा बरसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. पण अन्य फलंदाजांना चांगली फलंदाजी करता न आल्यामुळे पंजाबला 155 धावांवर समाधान मानावे लागले.
 

9.40 PM : आर. अश्विन OUT; पंजाबला मोठा धक्का

- बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आर. अश्विनला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. अश्विनने 21 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

9.37 PM : पंजाबला आठवा धक्का, अॅड्र्यू टाय बाद

- ख्रिस वोक्सने अॅड्र्यू टायला विराट कोहलीकरवी झेल बाद करत पंजाबला आठवा धक्का दिला. अॅड्र्यूला सात धावा करता आल्या.

9.35 PM : पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने पडछडीनंतर संघाचा डाव सावरला

- राहुल आणि नायर बाद झाल्यावर पंजाबची धावगतीमध्ये घसरण होत होती, अश्विनने ही कसर भरून काढली.

9.15 PM : मार्कस स्टोईनिस OUT; पंजाबला सहावा धक्का

- वॉशिंग्टन सुंदरने स्टोईनिसला बाद करत पंजाबला सहावा धक्का दिला. स्टोईनिसने 11 धावा केल्या

9.06 PM :  करुण नायर OUT; पंजाबला पाचवा धक्का

- राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला.

9.04 PM :  पंजाबच्या 12.3 षटकांत शंभर धावा पूर्ण 

9.00 PM :  लोकेश राहुलचे अर्धशतक तीन धावांनी हुकले; पंजाबला चौथा धक्का

- राहुल दमदार फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढत होता. तो झटपट अर्धशतक झळकावेल, असे वाटले होते. पण वॉशिंग्टन सुंदरने राहुलला सर्फराज खानकरवी झेलबाद केले. राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली.

8.50 PM : पंजाब 10 षटकांत 3 बाद 84

8.25 PM : पंजाब पाच षटकांत 3 बाद 48

- पंजाबला उमेश यादवने चौथ्या षटकात तीन धक्के दिले. पण त्यानंतर राहुल आणि करुण नायर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

8.22 PM : उमेश यादवचे एका षटकात तीन बळी

- उमेश यादवने आपल्या चौथ्या षटकात बंगळुरुच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. मयांक आणि फिंच यांना माघारी धाडल्यावर त्याने युवराज सिंगला त्रिफळाचीत केले.

8.20 PM :  सलग दुसऱ्या चेंडूवर उमेश यादवला बळी; मयांकनंतर फिंचला केले बाद

- चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेशने मयांकला बाद केले. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर उमेशने आरोन फिंचला शून्यावर बाद केले.

8.19 PM : पंजाबला पहिला धक्का; मयांक अगरवाल बाद

- उमेश यादवने चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवालला 15 धावांवर बाद केले.

8.02 PM : लोकेश राहुलने षटकाराने उघडले संघाचे खाते

- पहिल्या षटकात राहुलने दोन षटकार आणि एका चौकारासह तब्बल 16 धावांची वसूली केली.

7.59 PM : आरोन फिंचचा पंजाबच्या संघात समावेश

7.50 PM : बंगळुरुचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

पहिल्या विजयासाठी बंगळुरुचा संघ उत्सुक; पंजाबविरुद्ध आज सामना
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला आपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबशी दोन हात करताना बंगळुरुचा संघ पहिल्या विजयासाठी आसूसलेला असेल. बंगळुरुचा संघ सध्याच्या घडीला सातव्या स्थानावर आहे. या सामन्यात जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांना गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावता येईल.

आर. अश्विनच्या नेतृत्वाखालील पंजाबने पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली होती. लोकेश राहुलने पहिल्या सामन्यात 14 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत विक्रमाला गवसणी घातली होती. त्याच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने सहज सामना जिंकला होता. बंगळुरुविरुद्ध जर त्यांनी विजय मिळवला तर गुणतालिकेत त्यांना अव्वल स्थानावर पोहोचण्याचीही संधी मिळू शकते.

दोन्ही संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :  विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव,  ब्रेंडन मॅक्कुलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरे अँडरसन, कॉलिन डी ग्रांडहोम, मुरुगन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध अशोक जोशी. 


किंग्ज इलेव्हन पंजाब :आर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.


Web Title: RCB vs KXIP, IPL 2018 LIVE: Bangalore's decision to win toss
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.