RCB vs KKR, IPL 2018 : विराटला भारी पडला कार्तिक, कोलकात्याचा चार विकेटने विजय

पहिल्याच सामन्यात बंगळुरुचा पाच विकेटने पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 07:34 PM2018-04-08T19:34:02+5:302018-04-09T01:54:42+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs KKR, IPL 2018 Live Score: Kolkata Knight Riders vs Royal Challengers IPL 2018 Live Updates | RCB vs KKR, IPL 2018 : विराटला भारी पडला कार्तिक, कोलकात्याचा चार विकेटने विजय

RCB vs KKR, IPL 2018 : विराटला भारी पडला कार्तिक, कोलकात्याचा चार विकेटने विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : आक्रमक सलामीवीर सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर कोलकातानं नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी पराभव केला. आरसीबीने दिलेले १७७ धावांचे आव्हान कोलकाताने १८.५ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.

Live Updates -  

23:37PM - कोलकात्याचा बंगळुरुवर चार विकेटने विजय

 23:15PM - कोलकाताचे पाच फलंदाज तंबूत, दिनेश कार्तिकवर सर्व मदार

कोलकाताला 27 चेंडूंत 31 धावांची गरज. कर्णधार दिनेश कार्तिक 28 धावांवर खेळत आहे. 

22:48PM - कोलकाताच्या 100 धावा पूर्ण , सामना रोमांचक स्थितीत

 22:45PM रॉबिन उथप्पाच्या रुपात कोलकाताला तिसरा धक्का, 13 धावांवर झाला झेलबाद 

10:15PM - उमेश यादवने धोकादायक नरेनला केले त्रिफाळाचीत बाद

10:10PM - पाच षटकानंतर कोलकाताच्या एक बाद 65 धावा

ख्रिस लिन झटपट बाद झाल्यानंतर नरेनने बंगळुरुच्या गोलंदाजी पिसे काढली. नरेनने 18 चेंडूत अर्धशतक पुर्ण केलं. याखेळीत त्याने 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. 

09:52PM - सुनील नरेन आणि ख्रिस लीनने केली केकेआरच्या डावाची सुरुवात, बंगळुरुकडून चहलने टाकले पहिले षटक,  चहलच्या पहिल्या षटकांत नरेनने 12 धावा केल्या वसूल. 

09:50PM - कोलकाताला 177 धावांचे आव्हान -

धडाकेबाज सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम (४३) आणि विध्वंसक एबी डिव्हिलियर्स (४४) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २० षटकात ७ बाद १७६ धावांची आव्हानात्मक मजल मारली. मधली फळी कोलमडल्यानंतर मनदीप सिंगने केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीने चांगली धावसंख्या गाठली.
इडन गार्डन्सवर यजमान कोलकाताने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजीस निमंत्रित केले. क्विंटन डीकॉक (४) झटपट परतल्यानंतर मॅक्क्युलमने आक्रमक पवित्रा घेत कर्णधार विराट कोहलीसह संघाला सावरले. मॅक्क्युलम फटकेबाजी करत असताना कोहलीला मात्र अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. मॅक्क्युलम २७ चेंडूत ४३ धावा करुन परतल्यानंतर कोहली ३३ चेंडूत ३१ धावा करुन बाद झाला. यामुळे आरसीबीच्या धावगतीला खीळ बसली. डिव्हिलियर्स (२३ चेंडूत ४४ धावा) आणि मनदीप सिंग (१८ चेंडूत ३७) यांच्या आक्रमकतेमुळे आरसीबीने १७६ धावा उभारल्या. विनय कुमार व नितिश राणा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

09:32PM - बंगळुरुने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबतल्यात 176 धावांपर्यंत मजल मारली

आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावत 176 धावा करत कोलकाताच्या संघासमोर विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले.

09:05PM - 15 व्या षटकात बंगळुरुला दोन मोठे धक्के (RCB 132-4)

एबी डिविलियर्स 44 धावांवर बाद झाल्यानंतर लागोपाठ कर्णधार विराट कोहलीही (31) बाद झाला. नितेश राणाने 15 व्या षटकातील तीसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एबी डिविलियर्स आणि कर्णधार विराट कोहलीला बाद करत आरसीबीपुढील आडचणी वाढवल्या.

08:43PM - दहा षटकानंतर बंगळुरुच्या दोन बाद 82 धावा

एबी डिविलियर्सने फटकेबाजीला सुरुवात केली. चावलाच्या सलग दोन षटकार मारत संघाची धावसंख्या 82वर नेहली. एबी डिविलियर्सने सहा चेंडूत 16 धावा केल्या

08:35PM - ब्रेंडन मॅक्कुलम बाद, 9 षटकानंतर बंगळुरुच्या दोन बाद 66धावा

ब्रेंडन मॅक्कुलमने 27 चेंडूत 6 चौकार आणि 2 षठकारांसह 43 धावांची खेळी केली.  सध्या एबी डिविलियर्स आणि विराट कोहली मैदानावर आहेत. 

08:27 -  विराट कोहली-ब्रेंडन मॅक्कुलमची जोडी जमली

- पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये बंगळुरुने एका विकेटच्या मोबदल्यात 52 धावा काढल्या. सातव्या षटकांमध्ये नरेनने टिच्चून मारा केला. नरेनने सातव्या षटकांत फक्त दोन धावा देत धावगतीवर अंकूश टाकला. सध्या विराट कोहली (11) तर ब्रेंडन मॅक्कुलम (34) खेळत आहे. सात षटकानंतर बंगळुरुच्या एक बाद 54 धावां झाल्या आहेत.

08:11PM - बंगळुरुला पहिला धक्का, 2.4 षटकानंतर बंगळुरुच्या एक बाद 25 धावा

पियुष चावलाने क्विंटन डी कॉकला चार धावांवर केलं बाद, विराट कोहली(5) आणि ब्रेंडन मॅक्कुलम ​​​​​​(15)​मैदानावर

08:00PM - ब्रेंडन मॅक्कुलम आणि क्विंटन डी कॉक करणार बंगळुरुच्या डावाची सुरुवात,  कोलकाताकडून विनयकुमारच्या हाती चेंडू 

07:40PM - दिनेश कार्तिक - आतापर्यंत संघामध्ये सर्वकाही सुरळीत आहे. विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. लीन, नारायण, रसेल आणि जॉनसन हे चार विदेशी खेळाडू असतील. विजयासाठी प्रयत्नशील आसू. 

07:38 PM - विराट कोहली - विकेट फंलदाजीसाठी चांगली आहे. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभे करण्याचा प्रयत्न असेल. क्विंटन डी कॉक, एबी डिविलियर्स,  ख्रिस वोक्स आणि ब्रेंडन मॅक्कुलम हे चार विदेशी खेळाडू असतील. आमचा संघ संतुलित आहे. 

07:32 PM - दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोलकाता - कोलकाताचा संघ दोन वेळाचा आयपीएलचा विजेता आहे. पण कोलकाताने गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. यावेळी गंभीरकडे दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद आहे. कोलकाता आणि बंगळुरु संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाताने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर बंगळुरुला 9 वेळा विजय मिळवता आला आहे. 
मिचेल स्टार्क दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळं कार्तिकपुढे जॉनसन आणि आर विनय कुमार हे दोन वेगवान गोलंदाज आहेत. दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा यांच्यावर कोलकाता संघाची भिस्त असणार आहे. 

दुसरीकडे, तुफान फॉर्ममध्ये असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या हातात पुन्हा एकदा बंगळुरु संघाची कमान आहे.  विराट कोहलीच बंगळुरुची सर्वात मोठी ताकत आहे. विराटने आयपीएलच्या एका सत्रात चार शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, ब्रेंडन मॅक्कुलम, डीकॉक, ख्रिस वोक्स यांची कामगिरी बंगळुरु संघाची ताकद आहे.  युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या  फिरकी  जोडीला उमेश यादव आणि टिम साऊदी ही वेगवान मारा करणारी जोडी असेल. कोरी अंडरसन, कॉलिन डि ग्रँडहोमी आणि ख्रिस वोक्स सारखे तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत. 

प्रतिस्पर्धी संघ : 

  • बंगळुरु संघ: विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्कुलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरे अँडरसन, कॉलिन डी ग्रांडहोम, मुरुगन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध अशोक जोशी.

  • कोलकाता संघ: दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, नितीश राणा, रिंकू सिंह, शुभमन गिल, कॅमेरॉन डेलपोर्ट, शिवम मावी, टॉम कुरन, जॅवोन सीरल्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, विनय कुमार, कुलदीप यादव.

Web Title: RCB vs KKR, IPL 2018 Live Score: Kolkata Knight Riders vs Royal Challengers IPL 2018 Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.