भुवनेश्वरचा 'पॉवर पंच', श्रीलंकेचा 238 धावांत खुर्दा

लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज यांनी केलेली 122 धावांच्या शतकी भागीदारीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात लंकेला अपयश आले. अखेरच्या षटकांध्ये धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात फलंदाजांनी नांग्या टाकल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 03:39 PM2017-09-03T15:39:50+5:302017-09-03T19:30:43+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka's stumbling start, two shots given by Bhuvneshwar | भुवनेश्वरचा 'पॉवर पंच', श्रीलंकेचा 238 धावांत खुर्दा

भुवनेश्वरचा 'पॉवर पंच', श्रीलंकेचा 238 धावांत खुर्दा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो, दि 3 : मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यात श्रीलंकेनं भारतासमोर 239 धावांचे आव्हान ठेवलं आहे.  खराब सुरुवातीनंतर चौथ्या गड्यासाठी लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज यांनी केलेली 122 धावांच्या शतकी भागीदारीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात लंकेला अपयश आले. अखेरच्या षटकांध्ये धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात फलंदाजांनी नांग्या टाकल्या. भारताकाडून भुवनेश्वर कुमारने धारधार गोलंदाजी करताना लंकेच्या पाच फलंदाजांना माघारी झाडले. भुवनेश्वरनं लवंकेच्या दोन गड्यांना झडपट बाद करत दडपण निर्माण केलं होतं. त्यातच भर म्हणून बुमराहने कर्णधार थरंगाला बाद करत लंकेचे कंबरडेच मोडले होतं. पहिले 3 फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर चौथ्या गड्यासाठी लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज यांनी 122 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंखेच्या दिशेनं वाटचाल केली. मात्र भुवनेश्वर कुमारने लहिरु थिरीमनेचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. यानंतर काही वेळातच कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज महेंद्रसिंह धोनीकडे झेल देत माघारी परतला. यामुळे सुरुवातीच्या धक्क्यानंतर सावरलेल्या श्रीलंकेच्या संघाचे 5 गडी माघारी परतले. 

लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूजने लंकेचा डाव सावरत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली.  लहिरु थिरीमन आणि मॅथुज यांनी आर्धशतके साजरी केली. सलामीचे 3 फलंदाज माघारी परतलेले असताना या दोन्ही फलंदाजांनी संघाचा धावफलक हालता ठेवला. 
श्रीलंकेने दोनशे धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर आणखी एक खेळाडू धावबाद झाला. यानंतर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर अकिला धनंजया यष्टीचीत होऊन माघारी परतला. यादरम्यान महेंद्रसिंह धोनीने वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधीक यष्टीचीत करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. धोनीने आतापर्यंत 100 यष्टीचीत केले आहेत. यानंतर एकामागोमाक एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिल्याने अवघ्या काही मिनीटांमध्ये लंकेचे 9 गडी माघारी परतले. श्रीलंकेच्या तळातल्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत लंकेला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. मात्र भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाला बाद करत श्रीलंकेचा डाव 238 धावांवर संपवला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या. त्याला जसप्रीत बुमराहने २ तर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.  

पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची सुरुवात नेहमीप्रमाणे खराब झाली. भारताने शिखर धवन ऐवजी अजिंक्य रहाणेला संघात जागा दिली आहे. तर हार्दिक पांड्या आणि केदार जाधवलाही या सामन्यात आराम दिला आहे. भारताने अंतिम सामन्यात आपल्या संघात ३ बदल केलेले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही श्रीलंकेवर मात करत भारतीय संघ मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवतो का हे पहावं लागणार आहे.

नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध ५ सामन्यांची मालिका गमावली होती. त्यानंतर दुस-यांदा क्लीन स्वीप होण्याचे संकट यजमानांवर घोंगावत आहे. लंकेच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत असल्याने, या संघाने २०१९ च्या विश्वषकात थेट पात्रतेची संधीदेखील गमावली आहे. भारताकडून मागच्या वन-डे मालिकेत पराभूत झाल्यापासून लंकेने झिम्बाब्वेला दोनदा हरविले. दुसरीकडे, भारताने न्यूझीलंडला २०१० मध्ये आणि इंग्लंडला २०१२ मध्ये ५-० ने पराभूत केले होते. भारताविरुद्ध दोनदा ५-० ने मालिका गमावणारा इंग्लंड एकमेव संघ आहे. भारताने उद्या लंकेला नमविल्यास या पंक्तीत श्रीलंकेचादेखील समावेश होईल. लंकेतील उकाडा आणि उष्णता यांवर मात करून भारताने पाठोपाठ मिळविलेले विजय संस्मरणीय ठरले. संघाचे सर्वच खेळाडू फिट असले, तरी आधीचाच ११ जणांचा संघ उद्यादेखील खेळविला जाऊ शकतो. याचा अर्थ, मनीष पांडे, शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांना आणखी एक संधी मिळेल.

Web Title: Sri Lanka's stumbling start, two shots given by Bhuvneshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.