संजय मांजरेकर Exclusive : मुंबई इंडियन्सने जोसेफला खेळवून मोठी चूक केली

संजय मांजरेकर. 'मिस्टर परफेक्ट' क्रिकेटपटू, सुरेल समालोचक आणि कणखर टीकाकार. सध्या आयपीएल सुरु असताना मांजरेकर यांची खास मुलाखत 'लोकमत.com'ने घेतली. यावेळी विराट कोहलीचे नेतृत्व, धोनीचे मार्गदर्शन, आयपीएल, विश्वचषक आणि बऱ्याच गोष्टींवर मांजरेकर यांनी आपली मते व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 05:23 PM2019-04-11T17:23:37+5:302019-04-11T17:24:52+5:30

whatsapp join usJoin us
Sanjay Manjrekar Exlusive: Mumbai Indians made a big mistake by playing for alzarri joseph | संजय मांजरेकर Exclusive : मुंबई इंडियन्सने जोसेफला खेळवून मोठी चूक केली

छाया : सुशील कदम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेरच्या चेंडूवर बाजी मारली. या सामन्यात मुंबईचा हंगामी कर्णधा किरॉन पोलार्डने आपल्या नावाला साजेशी खेळी साकारली. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने एक मोठी चूक केली, असे भारताचे माजी तंत्रशुद्ध फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी सांगितले.

मुंबईच्या सामन्याबाबत आणि आपल्या समालोचनाबाबत मांजरेकर म्हणाले की, " माझा एक स्वभाव आहे, जेव्हा सगळं छान असतं तेव्हा मला जास्त बोलायला आवडतं नाही. जेव्हा कोणी चुकतं तेव्हा मला बोलायला आवडतं. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना पाहिला तर किरॉन पोलार्डचे कौतुक करायलाच हवे. पण त्यांनी अल्झारी जोसेफला खेळवून मोठी चूक केली. या गोष्टींचे त्यांना नुकसान झाले. कारण जोसेफने फक्त दोन षटके टाकली, तर हार्दिक पंड्याला चार षटके टाकावी लागली. कॉमेंट्रीमध्ये मला जास्त गॅप्स दिसतात. आता चुका बघायला माझं लक्ष इंग्लंड क्रिकेटकडे आहे.''

मांजरेकर म्हणाले की, " धोनीचे कर्णधारपद आणि फलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलमध्ये जास्त प्रभावी दिसतं. मुंबई इंडियन्सलाही जिंकण्याची संधी आहे. पण त्यांनी संघात काही बदल करावे लागतील. त्यामुळे हैदराबादचा संघ मला जास्त आवडतो. कारण त्यांच्याकडे स्पेशालिस्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत.''

आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघातून खेळायला आवडले असते

आयपीएलमधून मला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायला आवडलं असतं, त्याचबरोबर राजस्थानकडून मला खेळायला आवडलं असतं. कारण राजस्थानकडून खेळणं जास्त आव्हानात्मक आहे. मोठे खेळाडू संघात घेऊन जिंकणं सोपं असतं. पण नावाजलेले नसलेले खेळाडू घेऊन जिंकणं आव्हानात्मक असतं. राजस्थानकडून मला कर्णधारपद भूषवणं आवडलं असतं.

आयपीएलमुळे फलंदाजीचे तंत्र बिघडले
आयपीएलमुळे फलंदाजीचे तंत्र थोडेसे बिघडले आहे. जास्तकरून बचावात्मक फलंदाजी पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं. सर्व जगभरात हे झालं आहे. चेंडू स्विंग व्हायला लागला की फलंदाज अडचणीत आल्यासारखे वाटतात. सध्याच्या घडीला कसोटी सामने जास्त निकाली लागताना पाहयला मिळत आहेत. त्यामुळे चेतेश्वर पुजारासारखा खेळाडू सर्वांनाच हवाहवासा वाटतो. कसोटी क्रिकेट ज्यांना आवडतं ते बचावावर जास्त लक्ष देतील. लोकांनी क्रिकेट पाहावं, असंही बऱ्याच जणांना वाटतं. त्यामुळे आजची पिढी ही बचाव पाहायला स्टेडियममध्ये जाणार नाही. मला कसोटी आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट आवडतं, पण एकदिवसीय क्रिकेट आवडतं नाही.

IPL 2019 : मुंबईचा पो'लॉर्ड', अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्स विजयी

पोलार्ड... पोलार्ड... असा नाद वानखेडेवर घुमत होता. कारण मुंबई इंडियन्सचा कर्णधार किरॉन पोलार्डचे वादळ वानखेडे स्डेडियमवर आले होते. पोलार्डच्या या धडाकेबाज फटकेबाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. पोलार्डच्या या दमदार खेळीच्या जोरावरच मुंबईला पंजाबवर विजय मिळवता आला आणि धावांच्या मॅरेथॉनमध्ये ते सरस ठरले. पोलार्डने ३१ चेंडूंत १० षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ८३ धावांची तुफानी खेळी साकारली. पोलार्डच्या या खेळीमुळेच मुंबईला पंजाबवर तीन विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

Web Title: Sanjay Manjrekar Exlusive: Mumbai Indians made a big mistake by playing for alzarri joseph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.