Women's T20 World Cup: वेळापत्रक जाहीर! एकूण २३ सामने, ६ तारखेला IND vs PAK थरार

महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 02:18 PM2024-05-05T14:18:25+5:302024-05-05T14:19:03+5:30

whatsapp join usJoin us
 revealed for Women's T20 World Cup 2024 India will play against Pakistan on 6th October in the Women's T20 World Cup 2024  | Women's T20 World Cup: वेळापत्रक जाहीर! एकूण २३ सामने, ६ तारखेला IND vs PAK थरार

Women's T20 World Cup: वेळापत्रक जाहीर! एकूण २३ सामने, ६ तारखेला IND vs PAK थरार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women's T20 World Cup 2024 : महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. बांगलादेशची राजधानी ढाका आणि सिल्हेट येथे हे सामने खेळवले जातील. एकूण दहा संघ १८ दिवसांत २३ सामने खेळतील. कट्टर प्रतिस्पर्धी अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असेल. लिसा हिलीच्या नेतृत्वात कांगारूंचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहण्याजोगे असेल. 

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल. 

विश्वचषकातील भारताचे सामने -

  1. ४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड
  2. ६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान
  3. ९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर १
  4. १३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया

  • अ गट - ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर १
  • ब गट - दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर २

विश्वचषकाचे वेळापत्रक -

  1. ३ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंड, ढाका
  2. ३ ऑक्टोबर - बांगलादेश विरूद्ध क्वालिफायर २, ढाका
  3. ४ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरूद्ध क्वालिफायर १, सिल्हेट
  4. ४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
  5. ५ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज, ढाका
  6. ५ ऑक्टोबर - बांगलादेश विरूद्ध इंग्लंड, ढाका
  7. ६ ऑक्टोबर - न्यूझीलंड विरूद्ध क्वालिफायर १, सिल्हेट
  8. ६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान, सिल्हेट
  9. ७ ऑक्टोबर - वेस्ट इंडिज विरूद्ध क्वालिफायर २, ढाका
  10. ८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान, सिल्हेट
  11. ९ ऑक्टोबर - बांगलादेश विरूद्ध वेस्ट इंडिज, ढाका
  12. ९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर १, सिल्हेट
  13. १० ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका विरूद्ध क्वालिफायर २, ढाका
  14. ११ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
  15. ११ ऑक्टोबर - पाकिस्तान विरूद्ध क्वालिफायर २, सिल्हेट
  16. १२ ऑक्टोबर - इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज, ढाका
  17. १२ ऑक्टोबर - बांगलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
  18. १३ ऑक्टोबर - पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
  19. १३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, सिल्हेट
  20. १४ ऑक्टोबर - इंग्लंड विरूद्ध क्वालिफायर २, ढाका
  21. १७ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना, सिल्हेट
  22. १८ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना, ढाका
  23. २० ऑक्टोबर - अंतिम सामना, ढाका

Web Title:  revealed for Women's T20 World Cup 2024 India will play against Pakistan on 6th October in the Women's T20 World Cup 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.