ज्युनियर टीम इंडियाने असा साजरा केला राहुल द्रविडचा वाढदिवस 

भारतीय फलंदाजीची अभेद्य भिंत म्हणून कारकीर्द गाजवणारा राहुल द्रविड गुरुवारी ४५ वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर द्रविडने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी भारताच्या ज्युनिअर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 04:56 PM2018-01-11T16:56:59+5:302018-01-11T17:01:09+5:30

whatsapp join usJoin us
Rahul Dravid's birthday is celebrated by junior team India | ज्युनियर टीम इंडियाने असा साजरा केला राहुल द्रविडचा वाढदिवस 

ज्युनियर टीम इंडियाने असा साजरा केला राहुल द्रविडचा वाढदिवस 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन - भारतीय फलंदाजीची अभेद्य भिंत म्हणून कारकीर्द गाजवणारा राहुल द्रविड गुरुवारी ४५ वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर द्रविडने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी भारताच्या ज्युनिअर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ज्युनिअर क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार द्रविड सध्या भारताच्या १९ वर्षांखालील संघासह १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत गुंतला आहे. दरम्यान, भारताच्या १९ वर्षांखालील संघाने न्यूझीलंडमध्ये द्रविडचा वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेट केला. तसेच आपल्या लाडक्या प्रशिक्षकास शुभेच्छा दिल्या.





भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने केक कापून साजरा केला. यावेळ कर्णधार पृथ्वी शॉ याने द्रविडच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर इतर खेळाडूंनीही द्रविडच्या चेहऱ्यावर केक लावण्यासाठी गर्दी केली. द्रविडच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. भारताच्या ज्युनियर संघाबरोबरच टीम इंडियामधील द्रविडच्या माजी सहकाऱ्यांनीसुद्धा द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांनी द्रविडला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. 





आज ४५ वर्षांच्या झालेल्या द्रविडने १९९५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १६४ कसोटी सामन्यांमधील 286  डावांमध्ये १३ हजार २८८ धावा केल्या होत्या. तर ३४४  एकदिवसीय सामन्यांमध्ये १० हजार ८८९ धावा फटकावल्या होत्या. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जबरदस्त छाप पाडणाऱ्या द्रविडला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट खेळण्याची संधी मात्र फारशी मिळाली नाही. कारकीर्दीच्या अखेरीस २०११ साली त्याने आंरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव टी-२० सामना खेळला होता.   

11 जानेवारी रोजी जन्मलेल्या राहुल द्रविडला जॅमी या टोपण नावाने ओळखले जाते. द्रविडचे वडील किसान कंपनीमध्ये काम करत होते. त्याठिकाणी जॅम बनवला जात असे. त्यामुळे द्रविडच्या टिफीनमध्ये बऱ्याचदा जॅमचा समावेश असे, त्यामुळे मित्रांनी त्याला जॅमी हे टोपणनाव दिले होते.    



 

Web Title: Rahul Dravid's birthday is celebrated by junior team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.