IPL 2018 : आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच गंभीर संघाबाहेर; संदीप पाटील यांनी केला खुलासा

कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय गंभीरचाच होता, पण तो का? या प्रश्नाचे उत्तर माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 07:29 PM2018-04-28T19:29:25+5:302018-04-28T19:29:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: Gambhir Out of the serious team due to our 'Attitude'; Sandeep Patil disclosed | IPL 2018 : आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच गंभीर संघाबाहेर; संदीप पाटील यांनी केला खुलासा

IPL 2018 : आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच गंभीर संघाबाहेर; संदीप पाटील यांनी केला खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनीनंतर गंभीर हा संघातील महत्वाचा खेळाडू होता. पण आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच त्याने संघातील स्थान गमावले होते.

नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातून गौतम गंभीर का बाहेर पडला, हा सध्याच्या घडीला चाहत्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएलच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय गंभीरचाच होता, पण तो का? या प्रश्नाचे उत्तर माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिले आहे. पाटील यांनी आपल्या एका लेखामध्ये ' अॅटीट्यूड 'मुळेच गंभीर हा संघाबाहेर आसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाटील हे भारताचे निवड समितीचे अध्यक्ष असताना त्यांना गंभीरच्या वागण्याचा चांगलाच अनुभव आहे. गंभीर आणि आपल्यामध्ये 7-8 वर्ष चांगली मैत्री होती, पण त्याला संघातून बाहेर पाडल्यावर त्याने माझ्याशी बोलणेही सोडले, असे पाटील यांनी आपल्या लेखामध्ये म्हटले आहे.

पाटील यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, " गंभीरने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संघातील सलामीवीराची जागा मिळवली होती. तो नेहमीच क्रिकेटचा विचार करायचा. ' अॅटीट्यूड 'मुळेच त्याने संघातील आपले स्थान पक्के केले होते. महेंद्रसिंग धोनीनंतर गंभीर हा संघातील महत्वाचा खेळाडू होता. पण आपल्या ' अॅटीट्यूड 'मुळेच त्याने संघातील स्थान गमावले होते. त्याने जर धावा केल्या असत्या आणि चांगला व्यवहार केला असता तर त्याच्या संघातील स्थानाला धोका पोहाचला नसता. "

भारतीय संघातील ' अॅटीट्यूड ' गंभीरमध्ये अजूनही आहे. त्यामुळेच कर्णधारपद सोडल्यावर त्याने संघातील स्थानही नाकारले. दिल्लीने त्याला करारानुसार दिलेले पैसेही त्याने परत करणार असल्याचे सांगितले. एकंदरीत ' अॅटीट्यूड 'मुळेच सध्या गंभीर क्रिकेट सोडण्याचा मार्गावर आहे, असे म्हटले जात आहे.

 

Web Title: IPL 2018: Gambhir Out of the serious team due to our 'Attitude'; Sandeep Patil disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.