IND vs ENG : विराट आधी की रोहित?... 'हा' विक्रम करण्यासाठी रंगणार चुरशीचा सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन सामन्याच्या टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 12:45 PM2018-07-02T12:45:09+5:302018-07-02T12:59:07+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG: virat kohli and rohit sharma can achieve this rare feat against england | IND vs ENG : विराट आधी की रोहित?... 'हा' विक्रम करण्यासाठी रंगणार चुरशीचा सामना

IND vs ENG : विराट आधी की रोहित?... 'हा' विक्रम करण्यासाठी रंगणार चुरशीचा सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन -  भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन सामन्याच्या टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. टी-20 मालिकेनंतर भारत इंग्लंडविरोधात पाच कसोटी आणि तीन वन-डे सामन्याची मालिका खेळणार आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांना मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे. भारताच्या या दोन्ही अव्वल फलंदाजांना आतंरराष्ट्रीय टी-20 मध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. आतापर्यंत आतंरराष्ट्रीय टी-20 मध्ये फक्त तीन खेळाडूंना दोन हजार धावा पूर्ण करता आल्या आहेत. 

विराट कोहलीने 59 टी-20 सामन्यात 1992 धावा केल्या आहेत. दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीला आठ धावांची गरज आहे. विराटला आयर्लंडविरोधात हा विक्रम आपल्या नावार करण्याची संधी होती पण दोन्ही सामन्यात त्याला अपयश आले. आयर्लंडविरोधात पहिल्या सामन्यात शुन्य आणि दुसऱ्या सामन्यात 9 धावा करता आल्या. इंग्लंडविरोधात पहिल्या सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दोन हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरेल. 

विरोट कोहलीप्रमाणे रोहित शर्मालाही दोन हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. रोहत शर्माच्या नावावर सध्या 1949 धावा असून दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 51 धावांची गरज आहे. विरोट आणि रोहितने या मालिकेत  हा विक्रम केल्यास आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन हजार धावा पूर्ण करणारे चौथा आणि पाचवा खेळाडू ठरतील. तर भारताकडून पहिला आणि दुसरा खेळाडू होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.  

दोन हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू - 
मार्टिन गुप्टिल - 2,271 
ब्रेंडन मॅक्‍युलम - 2,140 
शोयब मलिक - 2026
 

Web Title: IND vs ENG: virat kohli and rohit sharma can achieve this rare feat against england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.