Ind vs Aus U19: फायनलमध्ये हार्विक देसाईने शानदार कॅच घेऊन करून दिली महेंद्रसिंह धोनीची आठवण

भारतीय अंडर 19 टीमचा विकेटकीपर हार्विक देसाईने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या फायनलमॅचमध्ये एक शानदार कॅच पकडत फॅन्सचं मन जिंकलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 12:19 PM2018-02-03T12:19:32+5:302018-02-03T12:20:54+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus U19: In the final, Harvic Desai smiles with great catch | Ind vs Aus U19: फायनलमध्ये हार्विक देसाईने शानदार कॅच घेऊन करून दिली महेंद्रसिंह धोनीची आठवण

Ind vs Aus U19: फायनलमध्ये हार्विक देसाईने शानदार कॅच घेऊन करून दिली महेंद्रसिंह धोनीची आठवण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई- टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला आपण अनेकदा विविध मॅचमध्ये शानदार कॅच घेतना पाहिलं आहे.महेंद्रसिंग धोनी दुनियेतील सर्वश्रेष्ठ विकेटकिपरमध्ये गणला जातो. टीम इंडियातील युवा विकेटकीपरही महेंद्रसिंग धोनीसारखं खेळायची इच्छा व्यक्त करतात. भारतीय अंडर 19 टीमचा विकेटकीपर हार्विक देसाईने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या फायनलमॅचमध्ये एक शानदार कॅच पकडत फॅन्सचं मन जिंकलं. हार्विकने कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन जयसन संघाला बाद केलं. बॉल स्टम्पवर आपटून मागच्या बाजूला आला होता त्यावेळी हार्विकने लांब उडी मारत तो कॅच पकडला. हार्विक देसाईने जबरदस्त कॅच पकडत भारतीया टीमला तिसरी आणि महत्त्वाची विकेट मिळवून देण्याचं काम केलं. हार्विक देसाईने घेतलेल्या या कॅचमुळे सगळीकडूनच त्याचं कौतुक होत असून महेंद्रसिंग धोनीबरोबर त्याची तुलना केली जाते आहे.

याआधी हार्विक देसाईने सेमीफायनल मॅचमध्ये पाकिस्तानच्या विरोधात एख स्टंपिंग केली होती. त्याने पाकिस्तानी खेळाडू साद खानला शानदारपद्धतीने स्टंपिंग करत महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. अनुकून रॉय फेकत असलेल्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर साद खान क्रीजपेक्षा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण हार्विकने त्याला यशस्वी होऊ दिलं नाही. 



 

आज सुरू असलेल्या सामन्यात जिंकणार संघ इतिहास रचणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दोन्हीही संघ आत्तापर्यंत तीन-तीन वेळा अंडर 19 वर्ल्डकप जिंकले आहे. आज जिंकणार संघ चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप नावे करणार असून तो एक रेकॉर्ड असेल. 
 

Web Title: Ind vs Aus U19: In the final, Harvic Desai smiles with great catch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.