धोनी-झिवाला बेसन लाडूचा मोह आवरेना; लाडूवर तुटून पडल्याचा व्हिडीओ केला शेअर

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि त्याची लाडकी मुलगी झिवा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 09:06 AM2017-10-16T09:06:43+5:302017-10-16T09:11:12+5:30

whatsapp join usJoin us
Mohan Awwana of Dhoni-Jivala Besan Laddu; Share the video that broke the laddu | धोनी-झिवाला बेसन लाडूचा मोह आवरेना; लाडूवर तुटून पडल्याचा व्हिडीओ केला शेअर

धोनी-झिवाला बेसन लाडूचा मोह आवरेना; लाडूवर तुटून पडल्याचा व्हिडीओ केला शेअर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि त्याची लाडकी मुलगी झिवा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. झिवा तर नेहमीच सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू असते.

मुंबई- टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि त्याची लाडकी मुलगी झिवा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. झिवा तर नेहमीच सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. झिवाचा धोनीने शेअर केलेला विमानातील व्हिडीओ किंवा कॅप्टन कोहलीने शेअर केलेला व्हिडीओ असो सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता पुन्हा एकदा धोनीची लाडकी मुलगी झिवा चर्चेत आली आहे. आता झिवाचा एक खास व्हिडीओ स्वतः धोनीने शेअर केला आहे. आपण सगळेच दिवाळीची विशेष तयारी करतो आहे, फराळही प्रत्येकाकडे तयार केलं जातं आहे. क्रिकेटर्सच्या घरीही तशीच लगबग सुरू आहे. धोनी आणि झिवा बेसनच्या लाडूवर तुटून पडल्याचा व्हिडीओ एम.एस धोनीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघंही लाडू खाताना दिसत आहेत. धोनीने शेअर केलेल्या या व्हिडीओला काही वेळातच चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या व्हिडीओला काही वेळातच लाखो व्यूव्ह्स मिळाले आहेत. धोनीच्या सगळ्या फॉलोअर्सकडून या व्हिडीओचं कौतुक होतं आहे. 

धोनीने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंन्ट करत दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तसंच व्हिडीओमुळे आम्हाला आमच्या बालपणीच्या दिवाळीची आठवण झाली असंही अनेकांनी म्हंटलं आहे. काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने झिवासोबत मस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याही व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सने भरभरून प्रतिसाद दिला. तसंच अनेक वेळा कोहलीने तिच्याबरोबरचे सेल्फीसुद्धा पोस्ट केले होते. रांचीत पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर कोहलीने धोनीच्या रांचीतल्या घराला भेट दिली होती. यावेळी धोनीची मुलगी झिवासोबतचा एक व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडिओत कोहली आणि झिवाची धमाल मस्ती पाहायला मिळली. कोहली आणि झिवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटीझनच्या चांगल्याच पसंतीस उतरला. या व्हिडीओमध्ये कोहली आणि झिवा मस्त गप्पा मारताना दिसत आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने झिवासाठी मांजरीचा आवाजही काढल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. 

विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. 'माझं झिवासोबर रियुनियन. अशा निष्पाप मुलीबरोबर राहणं यापेक्षा दुसरं भाग्य नाही, असं कॅप्शन विराटने व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. कॅप्टन विराट कोहलीने झिवासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात विराटने झिवाबरोबरचा सेल्फी पोस्ट केला होता. झिवा माझ्या मोबाइल सोबत खेळते आहे आणि मोबाइल कसा वापरयाचा हे तिला चांगलं माहिती असल्याचं विराटने तो फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं होतं. विराट आणि झिवाचा तो फोटो तेव्हाही सोशल मीडियावर सगळ्यांच्या पसंतीस उतरला होता. 

Web Title: Mohan Awwana of Dhoni-Jivala Besan Laddu; Share the video that broke the laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.