MI vs KXIP, IPL 2018 LIVE UPDATE: Yuvraj Singh returns to Punjab team | MI vs KXIP, IPL 2018 LIVE UPDATE : वानखेडेवर मुंबई-पंजाब सामन्याचा कसा रंगला थरार... पाहा हा व्हीडीओ
MI vs KXIP, IPL 2018 LIVE UPDATE : वानखेडेवर मुंबई-पंजाब सामन्याचा कसा रंगला थरार... पाहा हा व्हीडीओ

ठळक मुद्देआव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या लोकेश राहुलने दमदार फलंदाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि पंजाबच्या हातून सामना निसटला.

वानखेडेवर मुंबई-पंजाब सामन्याचा कसा रंगला थरार... पाहा हा व्हीडीओ 

पंजाबवर विजयासह मुंबई चौथ्या स्थानी

मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तीन धांवानी मात केली. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबईने कायरन पोलार्डच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या लोकेश राहुलने दमदार फलंदाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि पंजाबच्या हातून सामना निसटला. राहुलने 60 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 94 धावांची खेळी साकारली.

12.04 PM : मुंबईचा पंजाबवर तीन धावांनी विजय

12.03 PM : अक्षर पटेलचा षटकार, पंजाबला विजयासाठी 2 चेंडूत 9 धावांची गरज

12.02 PM : युवराज सिंग बाद; पंजाबला विजयासाठी 3 चेंडूंत 15 धावांची गरज

12.01 PM : पंजाबला विजयासाठी 4 चेंडूंत 15 धावांची गरज

12.00 PM : पंजाबला विजयासाठी 4 चेंडूंत 16 धावांची गरज

11.58 PM : पंजाबला विजयासाठी 6 चेंडूंत 17 धावांची गरज

11.54 PM : पंजाबला मोठा धक्का; लोकेश राहुल बाद

- बुमराने 19व्या षटकात राहुलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. राहुलने 60 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 94 धावांची खेळी साकारली.

 

1.52 PM : पंजाबला विजयासाठी 12 चेंडूंत 22 धावांची गरज

11.44 PM :  पंजाबला तिसरा धक्का; मार्कस स्टोईनिस बाद

- बुमराने सतराव्या षटकातच फिंचनंतर स्टोईनिसला बाद करत पंजाबला तिसरा धक्का दिला.

11.37 PM :  आरोन फिंच OUT; पंजाबला दुसरा धक्का

- जसप्रीत बुमराने फिंचला बाद करत पंजाबला दुसरा धक्का दिला. फिंचने 35 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 46 धावा केल्या.

11.28 PM :  पंजाबला विजयासाठी 30 चेंडूंत 60 धावांची गरज

11.17 PM : पंजाब 13 षटकांत 1 बाद 111

11.08 PM : लोकेश राहुलचे हंगामातील सहावे अर्धशतक

- राहुलने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 36 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे या हंगामातील हे सहावे अर्धशतक ठरले.

11.04 PM : पंजाब 10 षटकांत 1 बाद 86

11.00 PM : यंदाच्या आयपीएलमध्ये लोकेश राहुलच्या 600 धावा पूर्ण

10.51 PM : पंजाब सात षटकांत 1 बाद 66

10.43 PM :  ख्रिस गेल बाद; पंजाबला पहिला धक्का

- मिचेल मॅक्लेघनने धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. गेलने 11 चेंडूंत 2 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 18 धावा केल्या.

पोलार्डचे अर्धशतक; मुंबईच्या पंजाबविरुद्ध 186 धावा

मुंबई : संघात पुनरागमन करत कारयन पोलार्डने मुंबई इंडियन्समधली आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले. पोलार्डचे अर्धशतक आणि काही फलंदाजांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 186 धावा फटकावता आल्या. पोलार्डने 23 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या. पंजाबकडून अँण्ड्रयू टायने भेदक मारा करत फक्त 16 धावांमध्ये मुंबईच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. या चार बळींच्या जोरावर टायने पर्पल कॅपचे, आपणच हकदार असल्याचे दाखवून दिले.

10.01 PM :  मुंबईचे पंजाबपुढे 187 धावांचे आव्हान

9.51 PM : मुंबईला मोठा धक्का; हार्दिक पंड्या बाद

अँण्ड्रयू टायने हार्दिकला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. हार्दिक टायचा चौथा बळी ठरला. हार्दिकला 9 धावाच करता आल्या. 

9.45 PM : मुंबईला सातवा धक्का; बेन कटिंग बाद

- आर. अश्विनने बेन कटिंगला बाद करत मुंबईला सातवा धक्का दिला.

9.25 PM : अर्धशतकानंतर पोलार्ड लगेच बाद; मुंबईला सहावा धक्का

- अर्धशतक झळकावल्याॉवर पोलार्ड लगेच बाद झाला, अश्विनने पोलार्डला फिंचकरवी झेलबाद केले. पोलार्डने 23 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या.

9.26 PM : कृणाल पंडया OUT; मुंबईला पाचवा धक्का

- मार्कस स्टोईनिसने कृणाल पंड्याला बाद करत मुंबईला पाचवा धक्का दिला. कृणालने 23 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या.

9.10 PM : कृणाल पंडयाचे सलग दोन षटकार

- कृणाल पंड्याने मार्कस स्टोइनिसच्या बाराव्या षटकात सलग दोन षटकार लगावले. 

8.56 PM : मुंबई 10 षटकांत 4 बाद 79

8.45 PM : रोहित शर्मा OUT; मुंबईला मोठा धक्का

- पंजाबच्या अंकित राजपूतने युवराज सिंगकरवी रोहित शर्माला झेलबाद केले. मुंबईसाठी हा मोठा धक्का होता. रोहितला सहा धावा करता आल्या. मुंबई आठ षटकांत 4 बाद 72.

8.33 PM : मुंबईला सलग दोन धक्के; सूर्यकुमार आणि किशन बाद

अँण्ड्रयू टायने पुन्हा एकदा मुंबईला धक्के दिले. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर टायने अनुक्रने किशन आणि सूर्यकुमार यांना तंबूत धाडले. 

8.26 PM : मुंबई पाच षटकांत 1 बाद 57

8.17 PM : मुंबईला पहिला धक्का; इव्हिन लुईस बाद

- अँण्ड्रयू टायने आपल्या पहिल्याच चेंडूवर लुईसला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. लुईसला 9 धावाच करता आल्या. 

8.15 PM : सूर्यकुमार यादवचे सलग दोन षटकार

- पंजाबच्या तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादवने सलग दोन षटकार लगावले.

8.07 PM : इव्हिन लुईसचा मुंबईसाठी पहिला षटकार

- मोहित शर्माच्या दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुंबईचा सलामीवीर इव्हिन लुईसने दमदार षटकार लगावला. मुंबई 2 षटकांत बिनबाद 16.

7.40 PM : पंजाबच्या संघात युवराज सिंगचे पुनरागमन

7.30 PM : पंजाबने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले...  

मुंबईसाठी करो या मरो; पंजाबबरोबर आज सामना

मुंबई : सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये काही संघांना वेध लागले आहेत ते बाद फेरीत पोहोचण्याचे. मुंबई आणि पंजाब यांचे सध्याच्या घडीला 12 सामने झाले आहेत. पंजाबच्या खात्यात 12 आणि मुंबईच्या खात्यात 10 गुण जमा आहेत. त्यामुळे मुंबईने जर पंजाबविरुद्धचा सामना गमावला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे पंजाबसाठीदेखील ही अस्तित्वाची लढाई असेल. कारण हा सामना जिंकून त्यांना बाद फेरीचे दरवाजे ठोठावता येऊ शकतात. गेल्या सामन्यात त्यांचा 88 धावांत खुर्दा उडाला होता. त्यामुळे या सामन्यात त्यांनी युवराज सिंगला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे युवराज कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

दोन्ही संघ  

 

मुंबई आणि पंजाब संघांचे वानखेडेवर आगमन 


Web Title: MI vs KXIP, IPL 2018 LIVE UPDATE: Yuvraj Singh returns to Punjab team
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.