MI vs CSK, IPL 2018 LIVE : मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सने अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 08:10 PM2018-04-28T20:10:27+5:302018-04-28T23:42:17+5:30

whatsapp join usJoin us
MI vs CSK, IPL 2018 LIVE: MUMBAI WON THE TOSS AND ELECTED TO BOWL FIRST | MI vs CSK, IPL 2018 LIVE : मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय

MI vs CSK, IPL 2018 LIVE : मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकर्णधार रोहित शर्माने 33 चेंडूंत सहा चौकार दोन षटकारांच्य़ा जोरावर नाबाद 56 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय

पुणे : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सने अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या विजयासह मुंबईने सहावे स्थान पटकावले आहे, तर चेन्नईचे अव्वल स्थान कायम आहे. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला मुंबईने 169 धावांमध्ये रोखले. रैनाच्या नाबाद 75 धावांच्या खेळीच्या जो़रावर चेन्नईने मुंबईपुढे 170 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा मुंबईने फक्त दोन फलंदाज गमावत यशस्वी पाठलाग केला. सूर्यकुमार यादव (44) आणि इव्हिन लुईस (47) यांनी दमदार सलामी दिली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने 33 चेंडूंत सहा चौकार दोन षटकारांच्य़ा जोरावर नाबाद 56 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

11.37 PM : चेन्नई एक्सप्रेस मुंबईने रोखली, आठ विकेट्स राखून विजय

11.34 PM : रोहित शर्माचे 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण

11.28 PM :  मुंबईला विजयासाठी 12 चेंडूंत 22 धावांची गरज

11.23 PM : मुंबईला विजयासाठी 18 चेंडूंत 37 धावांची गरज

11.18 PM : मुंबईला दुसरा धक्का; इव्हिन लुईस बाद

- ब्राव्होने सतराव्या षटकात लुईसला बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. लुईसने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.

11.09 PM : मुंबई 15 षटकांत 1 बाद 123

10.59 PM : रोहितचे चौदाव्या षटकात दोन षटकार

- शेन वॉटसनच्या चौदाव्या षटकात रोहितने दोन षटकार लगावत विजयाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले.

10.45 PM : मुंबईला पहिला धक्का; सूर्यकुमार यादव बाद

- हरभजनने दहाव्या षटकात सूर्यकुमार यादवला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. सूर्यकुमारने 34 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 44 धावा केल्या.

10.37 PM : मुंबईची दमदार सलामी, 9 षटकांत बिनबाद 65

10.25 PM :  सहाव्या षटकात मुंबईचे अर्धशतक पूर्ण

- सहाव्या षटकामध्ये मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत संघाचे अर्धशतक पूर्ण केले.

9.58 PM : सूर्यकुमार यादवने चौकाराने केली मुंबईच्या डावाची सुरुवात

- सूर्यकुमार यादवने दुसऱ्याच चेंडूवर चौकार लगावत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली.
 

रैना बरसे... चेन्नईचे 169 धावांवर समाधान

पुणे : सुरेश रैनाचे फटके जेव्हा बरसतात तेव्हा डोळ्याचे पारणे फिटतात. शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याची नजाकतभरी फलंदाजी पाहता आली. अंबाती रायुडूने संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण त्याचे अर्धशतक यावेळी फक्त चार धावांनी हुकले. त्यानंतर मात्र रैनाने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या वाढवली. चेन्नईने 10 षटकांमध्ये 91 धावांपर्यंत मजल मारली होती, त्यामुळे चेन्नई दोनशे धावांचा टप्पा गाठेल असे वाटत होते. पण मिचेल मॅक्लेघनने अठराव्या षटकात महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांना बाद करत चेन्नईला मोठे धक्के दिले. पण रैनाने फटकेबाजी करत चेन्नईला 169 धावांपर्यंत मजल मारून दिली. रैनाने 47 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 75 धावांची खेळी साकारली.

9.40 PM : रैनाची दमदार फलंदाजी; चेन्नईचे मुंबईपुढे 170 धावांचे आव्हान

9.38 PM : चेन्नईला पाचवा धक्का, सॅम बिलिंग्स बाद

9.26 PM : चेन्नईला अठराव्या षटकातच दुसरा धक्का; धोनीनंतर ब्राव्हो बाद

- अठराव्या षटकातच मॅक्लेघनने चेन्नईला ब्राव्होला बाद करत दुसरा धक्का दिला, ब्राव्होला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

9.24 PM : चेन्नईला तिसका धक्का; धोनी बाद

- मुंबईचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेघनने अठराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीला बाद करत चेन्नईला तिसरा धक्का दिला. धोनीने 21 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 26 धावा केल्या.

9.12 PM : चेन्नई पंधरा षटकांत 2 बाद 117

- रैना आणि धोनी यांनी दमदार फलंदाजी करत संघाला पंधरा षटकांत 117 धावांपर्यंत मजल मारून दिली.

9.10 PM : धोनीचे सलग दोन चौकार

- हार्दिक पंड्याच्या पंधराव्या षटकात धोनीने सलग दोन चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले.

8.58 PM : तेराव्या षटकात चेन्नईचे शतक पूर्ण

- जसप्रीत बुमराने तेराव्या षटकात फक्त एकच धावा दिली, पण या एका धावेच्या मदतीने चेन्नईने आपले शतक पूर्ण केले.

8.52 PM :  चेन्नईला दुसरा धक्का; अंबाती रायुडू बाद

- मुंबईचा फिरकीपूटू कृणाल पंड्याने रायुडूला बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. रायुडूने 35 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 46 धावा केल्या.

8.45 PM :  चेन्नई 10 षटकांत 1 बाद 91

8.31 PM : सहाव्या षटकात चेन्नईचे अर्धशतक पूर्ण

8.25 PM : चेन्नई पाच षटकांत 1 बाद 39

8.19 PM : चेन्नईला पहिला धक्का; शेन वॉटसन बाद

- कृणाल पंड्याने सलामीवीर वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला.

8.01 PM : अंबाती रायुडूने षटकारासह केली डावाला सुरुवात

- रायुडूने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत झोकात सुरुवात केली.

7.30 PM : मुंबईचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय



 

चेन्नई की मुंबई, कोण मारणार बाजी...

पुणे : सध्याचा घडीला गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ शनिवारी दोन हात करणार आहे ते तळाला असणाऱ्या मुंबई इंडियन्सबरोबर. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईने ड्वेन ब्राव्होच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबईवर मात केली होती. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. त्यामुळे चेन्नईचे आव्हान मुंबईला पेलवणार का आणि कोणता संघ आज बाजी मारणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

 

दोन्ही संघ



 

 



 

Web Title: MI vs CSK, IPL 2018 LIVE: MUMBAI WON THE TOSS AND ELECTED TO BOWL FIRST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.