केदार जाधवचं टीम इंडियाला आदरातिथ्य, पुण्यातील घरी खास महाराष्ट्रीय मेजवानी

टीम इंडियातील पुण्याचा खेळाडू केदार जाधवने त्याच्या पुण्यातील नवीन घरी कॅप्टन विराट कोहलीसह सर्व खेळाडुंना घरी बोलावलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 09:58 AM2017-10-24T09:58:29+5:302017-10-24T10:01:42+5:30

whatsapp join usJoin us
Kedar Jadhav's Team India's hospitality, special Maharashtai banquet at home in Pune | केदार जाधवचं टीम इंडियाला आदरातिथ्य, पुण्यातील घरी खास महाराष्ट्रीय मेजवानी

केदार जाधवचं टीम इंडियाला आदरातिथ्य, पुण्यातील घरी खास महाराष्ट्रीय मेजवानी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे टीम इंडियातील पुण्याचा खेळाडू केदार जाधवने त्याच्या पुण्यातील नवीन घरी कॅप्टन विराट कोहलीसह सर्व खेळाडुंना घरी बोलावलं होतं.टीम इंडियासाठी महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती. भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वन डे सामना उद्या (25 ऑक्टोबर) पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहे.

पुणे- टीम इंडियातील पुण्याचा खेळाडू केदार जाधवने त्याच्या पुण्यातील नवीन घरी कॅप्टन विराट कोहलीसह सर्व खेळाडुंना घरी बोलावलं होतं.टीम इंडियासाठी महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती. भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वन डे सामना उद्या (25 ऑक्टोबर) पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया सोमवारी पुण्यामध्ये दाखल झाली. तेव्हा केदार जाधवनं टीम इंडियाला आपल्या नव्या घरी भोजनासाठी  बोलावलं होतं. यावेळी विराट कोहली आणि टीम इंडियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. जाधव कुटुंबियांच्या आदरतिथ्याने कोहली आणि टीम इंडिया भारावून गेली.

सिटी प्राइड कोथरूडच्या समोर केदार जाधवचं घर आहे. त्याच्या घरी भारतीय क्रिकेटपटू येणार, याबद्दलची माहिती काळी वेळातच पसरली आणि चाहत्यांनी केदार जाधवच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. टीम इंडियाची बस तेथे आल्यानंतर जमलेल्या गर्दीतूनच पोलीस संरक्षणांत खेळाडू केदारच्या घरी गेले. टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे फोटो काढण्यासाठी चाहते जाधव याच्या आपार्टमेंटमध्ये जिथून वाट मिळेल तिथून घुसत होते.

उद्या होणार दुसरी मॅच
भारत-न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना  बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी गहुंजे येथील स्टेडिअममध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे पुण्यात आगमन झाले. दरम्यान, केदारने आपल्या सहकाऱ्यांना नव्या घरी भोजनासाठी आमंत्रित केलं.

पहिल्या सामन्यात पराभव
दरम्यान, न्यूझीलंडने पहिल्या वन डे सामन्यात भारताचा 6 विकेट्स राखून पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टॉम लॅथम आणि रॉस टेलरने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 200 धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
 

Web Title: Kedar Jadhav's Team India's hospitality, special Maharashtai banquet at home in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.