IPL 2024: "कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण...", सौरव गांगुलीची 'मन की बात'!

IPL 2024 RR vs DC Live Score Card: दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक सौरव गांगुलीने एक मोठे विधान केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:13 PM2024-03-28T23:13:19+5:302024-03-28T23:13:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 RR vs DC Live Score Card Playing cricket is easier than coaching, says Delhi Capitals coach Saurav Ganguly | IPL 2024: "कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण...", सौरव गांगुलीची 'मन की बात'!

IPL 2024: "कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण...", सौरव गांगुलीची 'मन की बात'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 RR vs DCदिल्ली कॅपिटल्सचा संघ मागील काही हंगामापासून खराब कामगिरी करत आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात त्यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असेल. संघाचा कर्णधार रिषभ पंतचे (Rishabh Pant) या हंगामात पुनरागमन झाले आहे. दिल्लीच्या संघाचा प्रशिक्षक हा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आहे. त्यामुळे दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी गांगुलींवर देखील तितकीच आहे जितकी पंतवर आहे. गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सचा संघ राजस्थान रॉयल्सशी भिडला. (IPL 2024 News)

या सामन्यात नाणेफेक जिंकून रिषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत यजमान संघाला १८५ पर्यंत रोखले. पण, रियान परागने राजस्थानसाठी किल्ला लढवत सन्मानजनक धावसंख्या उभारली. या सामन्यात राजस्थानच्या डावादरम्यान समालोचकांनी दिल्लीचा प्रशिक्षक गांगुलीशी संवाद साधला.  

गांगुलीची 'मन की बात' 

समालोचकांशी बोलताना सौरव गांगुलीने एक मोठे विधान केले. तो म्हणाला की, कोचिंग करण्यापेक्षा मैदानात जाऊन क्रिकेट खेळणे हे कधीही सोपे काम आहे. कारण अशावेळी तुम्ही मैदानात असता त्यामुळे तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता. पण, प्रशिक्षक असताना फार काही करता येत नाही. कारण एकदा खेळाडू मैदानात गेले की प्रशिक्षक काहीही करू शकत नाही. 

दिल्लीचा संघ -
रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद आणि एनरिक नॉर्तजे.

राजस्थानचा संघ - 
संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

Web Title: IPL 2024 RR vs DC Live Score Card Playing cricket is easier than coaching, says Delhi Capitals coach Saurav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.