IPL 2019 : मुंबई इंडियन्स भिडणार कोणाला; सामने कधी व कोणाशी? 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) 12 व्या हंगामाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:09 PM2019-02-19T16:09:34+5:302019-02-19T16:22:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Mumbai Indians schedule in first 17 matches | IPL 2019 : मुंबई इंडियन्स भिडणार कोणाला; सामने कधी व कोणाशी? 

IPL 2019 : मुंबई इंडियन्स भिडणार कोणाला; सामने कधी व कोणाशी? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) 12 व्या हंगामाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. 23 मार्चपासून सुरू होणाऱ्या लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि  रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे भिडणार आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात ठेवता पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे. महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांच्यात सलामीचा सामना होणार असला तरी सर्वांना उत्सुकता लागली आहे ती मुंबई इंडियन्सच्या सामन्यांची.



मंगळवारी 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि त्यात मुंबई इंडियन्सच्या वाट्याला चार सामने आले आहेत. आठही संघांना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच सामने आले आहेत. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर दोन आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर दोन सामने खेळतील. मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स ( आधीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याशी होणार आहे. 

मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 
24 मार्च    मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स    मुंबई
28 मार्च    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू
30 मार्च    किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स    मोहाली
3 एप्रिल    मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    मुंबई









 

आयपीएलमधील 10 महागडे खेळाडू, तुम्हाला माहित आहेत का?
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने 16 कोटींत घेतले होते. 

आयपीएलमधील दहा महागडे खेळाडू
युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 कोटी ( 2015)
बेन स्टोक्स - पुणे सनरायजर्स 14.5 कोटी ( 2017)
युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 कोटी ( 2014)
बेन स्टोक्स - राजस्थान रॉयल्स 12.5 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स 12.5 कोटी ( 2014)
जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स 11.5 कोटी ( 2018)
गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडर्स 11.4 कोटी ( 2011)
लोकेश राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब 11 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10.5 कोटी ( 2015)
रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज 9.72 कोटी ( 2012)

Web Title: IPL 2019: Mumbai Indians schedule in first 17 matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.