IPL 2019 : अखेरच्या सामन्यातही वॉर्नर तळपला, पंजाबपुढे 213 धावांचे आव्हान

वॉर्नरने यावेळी 56 चेंडूंत 81 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 09:35 PM2019-04-29T21:35:32+5:302019-04-29T21:44:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: David Warner's solid knock, Sunrisers Hyderabad given 213 runs target to Kings XI Punjab | IPL 2019 : अखेरच्या सामन्यातही वॉर्नर तळपला, पंजाबपुढे 213 धावांचे आव्हान

IPL 2019 : अखेरच्या सामन्यातही वॉर्नर तळपला, पंजाबपुढे 213 धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल 2019 : आपल्या आयपीएलच्या अखेरच्या सामन्यातही सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तळपल्याचे पाहायला मिळाले. आपल्या धडाकेबाज 81 धावांच्या खेळीच्या जोरावर वॉर्नर आयपीएलला अलविदा करणार आहे. वॉर्नरच्या तुफानी खेळीच्या जोरावर हैदराबादला 212 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

पंजाबने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हैदराबादच्या सलामीवीरांनी या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी चार षटकांमध्येच संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पण साहाला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. साहाला 18 धावांवर असताना मुरुग्गन अश्विनने बाद केले.

साहा बाद झाल्यावर वॉर्नरची मनीष पांडेबरोबर चांगलीच जोडी जमली. या दोघांनी संघाला 160 धावांपर्यंत मजल मारून दिली. पण त्यानंतर फक्त तीन धावांमध्ये हे दोघेही फलंदाज बाद झाले. वॉर्नरने यावेळी 56 चेंडूंत 81 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये वॉर्नरने सात चौकार आणि दोन षटकार लगावले.

जेव्हा स्पायडर कॅमेरा गेलला पाहून घाबरतो तेव्हा, पाहा व्हिडीओ
ख्रिस गेल हा मॅचमध्ये बऱ्याच गोष्टी करत असतो. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्ये तर गेलचा एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. मैदानातील स्पायडर कॅमेरा हा गेलला घाबरल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले.

हा सामना सुरु असताना गेल क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी हा कॅमेरा गेलचा पाठलाग करत त्याच्या मागे गेला. ही गोष्ट जेव्हा गेलला समजली तेव्हा गेल त्या कॅमेराच्या दिशेने रागात चालत आला. त्यावेळी आपले आता काही खरे नाही, असे कॅमेरा ऑपरेटरला वाटले असावे. कारण जसा गेल कॅमेराजवळ गेला, तसा कॅमेरा हवेत झेपावल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ


Web Title: IPL 2019: David Warner's solid knock, Sunrisers Hyderabad given 213 runs target to Kings XI Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.