भारताची विजयी हॅटट्रिक! तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा 

कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत वनडे मालिकेत विजयी हॅटट्रिक साधली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 11:38 PM2018-02-07T23:38:33+5:302018-02-07T23:39:18+5:30

whatsapp join usJoin us
India's winning hat-trick! South Africa's 124 runs in the third ODI | भारताची विजयी हॅटट्रिक! तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा 

भारताची विजयी हॅटट्रिक! तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

केप टाऊन - कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत वनडे मालिकेत विजयी हॅटट्रिक साधली. त्याबरोबरच सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडीही घेतली. विराट कोहलीचे शतक आणि मोठ्या लक्ष्याच्या बचाव करताना गोलंदाजांनी केलेला भेदक मारा हे भारतीय संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.  
तत्पूर्वी
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज खेळीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला निमंत्रित केल्यावर विराट कोहलीने केलेल्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 394  धावांचे आव्हान दिले होते. 
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने शिखर धवनच्या साथीने भारताचा डाव सावरला. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. विराटप्रमाणेच शिखर धवननेही आक्रमक फलंदाजी केली. मात्र तो 76 धावांवर बाद झाला. 
शिखर धवन बाद झाल्यावर भारताच्या इतर फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही. अजिंक्य रहाणे (11), हार्दिक पांड्या (14), महेंद्र सिंग धोनी (10) आणि केदार जाधव (1) हे झटपट बाद झाले. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या विराटने छोट्या पण उपयुक्त भागीदाऱ्या रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. दरम्यान विराटने या मालिकेतील दुसरे आणि वनडे कारकिर्दीतील 34 वे शतक पूर्ण केले.   

Web Title: India's winning hat-trick! South Africa's 124 runs in the third ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.