मुंबई : इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 30 मे 2019 रोजी यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याने क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. पाच जूनला द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना रंगणार आहे. 2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफोर्डवर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी 16 जून 2019 रोजी भिडणार आहेत. तर 14 जुलैला विश्वचषकाची अंतिम फेरी रंगणार आहे.
आयसीसीच्या वनडे क्रमवारीनुसार 30 सप्टेंबर 2017 रोजीच ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांनी विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित केले होते. तर वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी मार्च महिन्यात क्वॉलिफायर स्पर्धा पार करुन जागा मिळवली.
भारताचे सामने खालीलप्रमाणे होतील :
-   बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिका
 -   रविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलिया
 -  गुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंड
 -  रविवार 16 जून 2019 : पाकिस्तान
 -  शनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तान
 -  गुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिज
 -  रविवार 30 जून 2019: इंग्लंड
 -   मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश
 -  शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका
 -  मंगळवार 9 जुलै 2019 : उपांत्य फेरी 1
 -  बुधवार 10 जुलै 2019 : राखीव दिवस
 -  गुरुवार 11 जुलै 2019 : उपांत्य फेरी 2
 -  शुक्रवार 12 जुलै 2019 : राखीव दिवस
 -  रविवार 14 जुलै 2019 : अंतिम फेरी