इंग्लंडच्या क्रिकेटची ' राख'  झाली आणि अॅशेसचा जन्म झाला

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1982 सालापूर्वीही क्रिकेट खेळले गेले होते. पण ते सामने अॅशेसमध्ये धरले जात नाहीत, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 05:27 PM2018-08-29T17:27:52+5:302018-08-29T17:28:18+5:30

whatsapp join usJoin us
England's cricket was 'ash' and Ashes was born | इंग्लंडच्या क्रिकेटची ' राख'  झाली आणि अॅशेसचा जन्म झाला

इंग्लंडच्या क्रिकेटची ' राख'  झाली आणि अॅशेसचा जन्म झाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकाही जणांनी तर इंग्लंडचे क्रिकेट मरण पावले आणि त्याची राख आता ऑस्ट्रेलियाला घेऊन जाण्यात येईल, असे म्हटले

लंडन : अॅशेस मालिका ही क्रिकेटप्रेमींच्या परवलीचीच. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका म्हणजे अॅशेस, हे क्रिकेट खेळणारा लहानगाही सांगू शकतो. या अॅशेस मालिकेची आठवण काढायचे कारण एवढेच की, या मालिकेला सुरुवात झाली ती आजपासून, 1982 साली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1982 सालापूर्वीही क्रिकेट खेळले गेले होते. पण ते सामने अॅशेसमध्ये धरले जात नाहीत, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का...

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1882 साली ओव्हल मैदानात एक सामना खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 85 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. इंग्लंडकडून सर ग्रेस यांनी 32 धावा केल्या. पण अन्य फलंदाजांची त्यांना चांगली साथ मिळाली नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज फ्रेड यांनी 44 धावांत सात बळी मिळवत इंग्लंडचा डाव 77 धावांत आटोपण्यात मोलाचा वाटा उचलला. हा सामना इंग्लंडला सात धावांनी गमवावा लागला.

हा सामना गमावल्यावर काही जणांनी इंग्लंडवर जोरदार टीका केली. काही जणांनी तर इंग्लंडचे क्रिकेट मरण पावले आणि त्याची राख आता ऑस्ट्रेलियाला घेऊन जाण्यात येईल, असे म्हटले. त्यामुळेच इंग्लंडचे क्रिकेट मरण पावले आणि अॅशेसचा जन्म झाला, असे म्हटले जाते. आयसीसीनेही आपल्या ट्विटर हँडलवर ही पोस्ट टोकली आहे.

आयसीसीने नेमकी काय पोस्ट टाकली आहे ती पाहा


Web Title: England's cricket was 'ash' and Ashes was born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.