ब्रायन लारा ताडोबा सफारीवर; फोटो झाला वायरल

आता भारताच्या कोणत्या खेळाडू लाराला हा सल्ला दिला, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 06:04 PM2019-06-12T18:04:59+5:302019-06-12T18:06:07+5:30

whatsapp join usJoin us
Brian Lara Tadoba Safari From the advice of India's 'player' | ब्रायन लारा ताडोबा सफारीवर; फोटो झाला वायरल

ब्रायन लारा ताडोबा सफारीवर; फोटो झाला वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चंद्रपूर: भारताच्या माजी खेळाडूच्या सांगण्यावरून वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा हा ताडोबा येथे सफारी करण्यासाठी आला होता. लाराने सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळी सफारीचा आनद लुटला.

लारा हा क्रिकेट विश्वचषकाच्या एका कामासाठी मुंबईत आला आहे. यावेळी भारताच्या एका माजी खेळाडूने लाराला ताडोबा व्याघ्र प्रकल्यापा भेट देण्याचे सुचवले. त्यानुसार लारा ताडोबा येथे पोहोचला. आता भारताच्या कोणत्या खेळाडू लाराला हा सल्ला दिला, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.

लारा मंगळवारी संध्याकाळी ताडोबा येथे पोहोचला. त्यानंतर पहाटे त्याने सफारी केली. दुपारी थोडा आराम केल्यावर संध्याकाळी पुन्हा एकदा तो सफारीसाठी निघाला. यावेळी लाराबरोबर सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. लाराला ताडोबात व्याघ्र दर्शन झाले वा नाही हे मात्र कळू शकले नाही. ताडोबातील वाघाने ब्रायन लारालाही भुरळ घातल्याची चर्चा त्याठिकाणी असलेल्या पर्यटकांमध्ये रंगत होती. 
ताडोबा हे जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ असून येथील वाघांना बघण्यासाठी दरवर्षी सुमारे दोन लाखांवर पर्यटक भेटी देतात. यामध्ये विविध देशातील प्रसिद्ध व्यक्तींसह सिनेकलावंत, क्रिकेटपटू व अन्य क्षेत्रातील नामांकित मान्यवरांचा यात समावेश असतो. ताडोबाची किर्ती वेस्ट इंडीजमध्येही पोहचली आहे. यामुळेच क्रिकेट जगतात वेगळी छाप सोडणाºया ब्रायन लारालाही ताडोबातील वाघांनी आकर्षित केले.

मंगळवारी सायंकाळी ब्रायन लारा आपल्या सहकाºयांसह ताडोबाच्या परिसरात दाखल झाला. रात्रीला एका रिसोर्टमध्ये मुक्काम करून आज सकाळी कोलारा गेटमधून ताडोबाच्या सफारीवर गेला. ताडोबात लाराला वाघाने दर्शन दिले वा नाही याबाबत मात्र कळू शकले नाही. ताडोबामध्ये सध्या ‘माया’ नावाने प्रसिद्ध असलेली वाघीण पर्यटकांना हमखास दर्शन देत आहे. या वाघिणीने ब्रायल लारालाही दर्शन दिले असावे, असा कयास लावला जात आहे. ब्रायन लारा ताडोबात येणार असल्याची माहिती ताडोबा प्रशासनाला ठाऊक होती. मात्र ब्रायन लाराचे चाहते त्या ठिकाणी गर्दी करतील, ही बाब लक्षात घेऊन अन्य हायप्रोफाईल व्यक्तींप्रमाणे लाराचा दौराही गुप्त ठेवण्यात आला. ब्रायन लाराने सकाळी ताडोबाची सफारी केल्याच्या वृत्ताची पुष्टी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी केली.

लारा मुंबईत विश्वचषकाच्या कामासाठी आला होता. काही दिवस त्याच्याकडे वेळ होता. त्यावेळी भारताचे माजी फिरकीपटू आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी लाराला ताडोबा येथे जाण्याचा सल्ला दिला होता.

Web Title: Brian Lara Tadoba Safari From the advice of India's 'player'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.